शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले शिवनेरीवरील बुलंद दरवाजे सज्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 01:55 IST

शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवरील शिवाई, मेणा आणि कुलूप, प्रवेशद्वारांचे दरवाजे पुरातत्त्व विभागाच्या वतीने नव्याने बसविण्यात येत आहेत.

जुन्नर : शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवरील शिवाई, मेणा आणि कुलूप, प्रवेशद्वारांचे दरवाजे पुरातत्त्व विभागाच्या वतीने नव्याने बसविण्यात येत आहेत. महाकाय, दर्जेदार टिकाऊ सागाच्या लाकडातून ऐतिहासिक धाटणीचे हे दरवाजे कुशल कारागिरांनी बनविले आहेत. त्यामुळे शिवकालीन दुर्गबांधणीचे ‘मॉडेल फोर्ट’ म्हणून आकारास येत असलेल्या किल्ले शिवनेरीचे भव्य बुरुजयुक्त बुलंद दरवाजे शिवप्रेमी, दुर्गप्रेमींच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभाग, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या एकत्रित प्रयत्नातून किल्ले शिवनेरी संवर्धनाची कामे मागील १० वर्षांपासून सुरू आहेत. शिवनेरीच्या प्रवेशमार्गावरऐकून सात भव्य बुरुजयुक्त प्रवेशद्वार (वेशी) आहेत. घडीव, दगडी चिरेबंदी बांधणीतील या प्रवेशद्वारापैकी फक्त हत्ती प्रवेशद्वाराचा महाकाय दरवाजा ऊन-पावसाला तोंड देत चांगल्या अवस्थेत उभा होता. इतर सहा प्रवेशद्वारांचे लाकडी दरवाजे नामशेष झाले होते. हे दरवाजे पुन्हा नव्या दिमाखात उभे करण्याची संकल्पना पुरातत्त्व विभागाचे संरक्षक सहायक बी. बी. जंगले यांच्या प्रयत्नातून राबविण्यात आली.चार वर्षांपूर्वी गडावरील पहिला महादरवाजा, तर दुसऱ्या परवानगी प्रवेशद्वाराला नवीन सागवानी दरवाजे बसविण्यात आले होते. आता शिवाई मंदिराकडे जाणारा शिवाई दरवाजा, गडावर जाणारा मेणा दरवाजा आणि कुलूप दरवाजा या तीन प्रवेशद्वारांवर महाकाय असे सागवानी दरवाजे बसविण्यात आले आहेत. हे दरवाजे तयार करण्यासाठी लागणारे उत्तम प्रतीचे जुने सागवानी लाकूड विदर्भातील बल्लारशा येथील वनविभागाच्या डेपोतून उपलब्ध करून देण्यात आले होते. लेण्याद्री येथे पुरातत्त्व विभागाच्या गोदामात हे दरवाजे तयार करण्यात आले. दरवाजे प्रवेशद्वारांवर लावण्यात आल्यानंतर त्यावर लोखंडी कड्या, तसेच पारंपरिक पद्धतीचा लोखंडी साज, हत्तींना दरवाजाला धडका देता येऊ नयेत, म्हणून दरवाजावर बसविले जायचे लोखंडी खिळे बसविण्याचे काम आता सुरू आहे.>गडाची सुरक्षा राहणार अबाधीतशिवनेरीवरील या सर्वात मोठ्या व चांगल्या अवस्थेत असलेल्या अंबारखाना इमारतीच्या कमानीचादेखील महाकाय दरवाजा बसविण्यात आला आहे. तसेच या इमारतीच्या खिडक्यांना लाकडी चौकटी व जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. या इमारतीतील शस्त्रास्त्र संग्रहालय आणि अ‍ॅम्फीथिएटर उभारण्याचे शासनाचे नियोजन आहे. परंतु या वास्तूचे संरक्षण आणि मजबुतीकरणाचे काम प्राधान्याने करणे गरजेचे आहे.किल्ले शिवनेरी राष्ट्रीय संरक्षित स्मारक आहे. ती वास्तू पुरेशी संरक्षित असावी, प्रवेशद्वारांना त्यांचे मूळ स्वरूप प्राप्त व्हावे, या हेतूने बसविण्यात आलेल्या दरवाजांमुळे गडाची सुरक्षादेखील अबाधित राहण्यास मदत होणार आहे.गडावरील शिवाई प्रवेशद्वाराची बांधणी अलीकडील पेशवेकाळात झालेली आहे, तर गडवाटेवरील सात दरवाजांच्या मालिकेतील सर्वच दरवाजांची बांधणी एकाच कालखंडात केलेली नसून वेगवेगळ्या राजवटी गडावर नांदत असताना झाली असल्याचे बांधकामाच्या शैलीवरून स्पष्ट होते.