शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी हापूस काही दिवसांसाठीच

By admin | Updated: May 29, 2017 02:46 IST

खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविणारा रत्नागिरी हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. आणखी ८ ते १० दिवस हापूसची आवक

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविणारा रत्नागिरी हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. आणखी ८ ते १० दिवस हापूसची आवक बाजारात सुरू राहणार आहे. दरम्यान, रत्नागिरी हापूस गेला तरी पुणेकरांना गावरान हापूसची चव चाखता येणार आहे. गावरान हापूसची आवक वाढली असून भावही आवक्यात आहेत. रत्नागिरी हापूसचा हंगाम यंदा लवकर सुरू झाला होता. पोषण वातावरणामुळे उत्पादनही चांगले आहे. त्यामुळे या हंगामात रत्नागिरी हापूस लवकरच सर्वसामान्यांच्या आवक्यात आला. आता कोकणामध्ये मॉन्सूनचे वारे वाहू लागल्याने हंगाम जेमतेम ८ ते १० दिवसांचा उरला आहे. या काळात बाजारात आवक होत राहील. मात्र, प्रमाण तुलनेने कमी असणार आहे. कर्नाटक हापूसची आवक तुलनेत दोन आठवड्यापर्यंत होईल. रविवारी बाजारात रत्नागिरी हापूसची १ ते २ हजार पेटी, तर कर्नाटक हापूसच्या ४ ते ५ हजार पेट्यांची आवक झाली.बाजारात भोर, वेल्हा, खडकवासला, मावळ व मुळशी भागातून गावरान हापूस, पायरी आणि रायवळची आवक वाढू लागली आहे. रविवारी बाजारात सुमारे १०० डागांची आवक झाली. ही आवक जुलै महिन्यापर्यंत कायम राहील, असे व्यापारी तात्या कोंडे यांनी सांगितले.घाऊक बाजारातील आंब्याचे भाव रत्नागिरी हापूस (तयार ) - ४ ते ६ डझन - ८०० ते १२००८ ते १० डझन - १००० ते १३००कर्नाटक हापूस (तयार) ३ ते ५ डझन - ६००-१०००कर्नाटक पायरी (तयार)३ ते ५ डझन - ५०० ते ७००"गावरान आंबा (प्रतिडझन)गावरान - २०० ते २५० पायरी - १०० ते १२० रायवळ - ४० लालबाग (१ किलो) १५ -२०, तोतापुरी (१ किलो) १५-२०, नाटी (१ किलो) १३-१६, बदाम (१ किलो) २०-२५, गुजरात केशर (१ किलो) ४०-५०, गुजरात हापूस (१ किलो) ५०-६०, राजपुरी (१ किलो) २५-५०.