शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रुग्णालयात लसीकरणाचा दर एकच ठेवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:12 IST

पुणे : शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाचे वेगवेगळे दर असल्याने नागरिकांकडून लूट होत असल्याची ओरड आहे. शासनाने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा ...

पुणे : शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाचे वेगवेगळे दर असल्याने नागरिकांकडून लूट होत असल्याची ओरड आहे. शासनाने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम घेऊन लस दिली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाचा एकच दर निश्‍चित करण्याची मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

शासनाच्या मान्यतेनंतर मागील आठवड्यापासून काही खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र, राज्य सरकार व खासगी संस्थांसाठी लसींचे वेगळे दर निश्‍चित करण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयांना ६०० रुपये दराने कोव्हिशिल्ड लस उपलब्ध होत आहे. मात्र, लसीकरणासाठी रुग्णालये ९०० रुपयांपासून बाराशे रुपयांपर्यंत दर आकारत आहेत.

कोरोनावरील उपचार, स्वॅब चाचणीचे दर जसे निश्‍चित केले; त्यानुसार लस खरेदीची किंमत व लसीकरणाचे दर निश्‍चित करावेत, अशी मागणी मोहोळ यांनी केली आहे.

--///--

रुग्णसंख्या कमी होत असताना लाट ओसरत असल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे. राज्यात ३१ मेपर्यंत संचारबंदी आहे. १ जूनपासून काही प्रमाणात अनलॉक करण्याबाबत शासन स्तरावर हालचाली सुरू आहेत. दुसऱ्या लाटेचा अनुभव पाहाता शासनाने अनलॉक करण्यासाठी घाईगडबड करू नये व टप्प्याटप्प्याने प्राधान्यक्रम ठरवून अनलॉक करावे.

- मुरलीधर मोहोळ, महापौर

-----

स्थायी समितीकडून कारवाईचा प्रस्ताव

शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा लसीकरणासाठी अधिक रक्कम आकारल्यास रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करावी असा ठराव स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला. तसेच, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासह काही खासगी रुग्णालये लसीकरणासाठी निधी संकलन करून गरिबांना मोफत लस पुरविणार आहेत. अशा प्रकारचे काम अन्य रुग्णालयांनी करावे असे ठरावात नमूद करण्यात आल्याचे स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.