शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोळोलीत दुर्मिळ ‘मार्बल्ड बलुन फ्रॉग’ बेडुक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 20:46 IST

या बेडकाच्या पाठीवर असणारी संगमरवरी दगडा प्रमाणे नक्षी ही बेडकाचे वैशिष्ट्य आहे. या बेडकाला स्पर्श...

ठळक मुद्देवाळवी,मुंगी,मुंगळे आदी किटक या बेडक़ाचे भक्ष्य काळजी घेउन बेडकाला लवकरच दाट झाडीच्या वनविभागात सोडण्यात येणार

बारामती : कोळोली (ता. बारामती) येथे दुर्मिळ जातीचा बेडुक आढळला आहे.अत्यंत दुर्मिळ असलेला हा बेडुक तालुक्यात प्रथमच आढळला आहे. ‘मार्बल्ड बलुन फ्रॉग’ असे या दुर्मिळ बेडकाचे नाव आहे. बारामतीच्या युवकांमुळे या बेडकाचा शोध लागला .कोळोली येथील अशोक कांबळे यांच्या शेतात हा बेडुक आढळुन आला आहे.सुरवातीला या बेडकाने केवळ तोंड बाहेर काढले होते.त्यामुळे घोणस साप असल्याचा भास कांबळे कुटुंबियांना झाला.त्यामुळे त्यांना साप पकडण्यासाठी येथील नेचर फ्रेंड्स आॅर्गनायझेशनच्या कार्यकर्त्यांना बोलविले. आॅर्गनायझेशनचे प्रमुख बबलु कांबळे त्यांच्या सहकाऱ्यांसह त्याठिकाणी पोहचले.यावेळी त्यांना हा घोणस साप नसुन दुर्मिळ बेडुक असल्याचे आढळुन आले. हा बेडुक पाहण्यासाठी गर्दी झाली होती.या बेडकाच्या पाठीवर असणारी संगमरवरी दगडाप्रमाणे नक्षी ही बेडकाचे वैशिष्ट्य आहे. नक्षी खुप आकर्षक असते. या बेडकाला स्पर्श केल्यास तो चेंडुप्रमाणे गोल होतो. हा खुप दुर्मिळ बेडुक आहे.दिवसा हा बेडुुक स्वताला जमीनीखाली पुरुन घेतो.केवळ रात्री भक्ष्य खाण्यासाठी तो बाहेर पडतो.वाळवी,मुंगी,मुंगळे आदी किटक या बेडक़ाचे भक्ष्य आहे,असे कांबळे यांनी सांगितले.यापुर्वी परीसरात पांढरी घोणस,पांढरा नाग,पांढरा डुरक्या घोणस, पांढरा मणियार,पोवळा,रेती सर्प आदी दुर्मिळ सापांसह किंचाळणारे घुबड ,पांढरा कावळा हे दुर्मिळ पक्षी आढळले आहेत.बारामती परिसरात हा बेडुक प्रथमच आढळला आहे.हा बेडुक दुर्मिळ असुन त्याचे वास्तव्य दाट झाडीत असते. त्याची काळजी घेउन त्याला लवकरच दाट झाडीच्या वनविभागात सोडण्यात येणार आहे, असे कांबळे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Baramatiबारामती