शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
3
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
4
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
5
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
6
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
7
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
8
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
9
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
10
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
11
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
12
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
13
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
14
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
15
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
16
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
17
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
18
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
19
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर

बलात्कारप्रकरणी नराधमास महिलांचा चोप

By admin | Updated: May 29, 2014 05:01 IST

मूक-बधिर तरुणीवर मूकबधिर विवाहित तरुणाने ८ महिन्यांच्या कालावधीत वारंवार अत्याचार केला.

पिंपरी : मूक-बधिर तरुणीवर मूकबधिर विवाहित तरुणाने ८ महिन्यांच्या कालावधीत वारंवार अत्याचार केला. तिचा गर्भपातही करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या नराधमास बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास दामिनी ब्रिगेडच्या महिला सदस्यांनी चोप देऊन भोसरी पोलिसांच्या स्वाधिन केले. सायंकाळी उशिरापर्यंत चौकशी करण्याचे काम सुरू असल्याने गुन्हा दाखल झाला नव्हता. रवींद्र नारायण नलावडे (वय २८, रा. शांतीनगर, भोसरी) हे चोप दिलेल्या नराधमाचे नाव आहे. पीडित तरुणी प्राधिकरण, निगडी येथे आयटीआयचे शिक्षण घेत आहे. नलावडेची पत्नी प्राधिकरण, निगडीतील मूकबधिर विद्यालयात शिक्षिका असून, ती तरुणीला शिकवत असे. तिचे व तरुणीच्या कुटुंबीयांचे चांगले संबंध आहेत. दोघा पतीपत्नीचे तरुणीच्या घरी येणे जाणे होते. शिकवणीला घेऊन जातो, असे सांगून नलावडे तरुणीस बाहेर नेऊन तिच्यावर अत्याचार करीत होता. तिला दम देऊन, अश्लील चित्रफिती दाखवून, तसेच गुुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार करीत असे. टीव्हीवर गुन्हेविश्वावरील मालिका पाहून तरुणीने झालेला अन्यायाला वाचा फोडण्याचे धाडस केले. तिने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. या संदर्भात मदतीसाठी त्यांनी नगरसेविका सुलभा उबाळे यांची भेट घेतली. मूकबधिर असल्याने ती काय सांगत आहे, हे समजत नव्हते. उबाळे यांनी त्वरित मूकबधिर शाळेतील निवृत्त शिक्षिकेस बोलावून घेतले. त्या शिक्षिकेने तरुणीशी संवाद साधल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यमुनानगर, निगडी येथील दामिनी ब्रिगेडच्या महिला सदस्या संबंधित तरुणीस घेऊन भोसरी येथील नलावडेच्या घरी गेल्या. तो घरी नसल्याने महिला दुपारी तीनच्या सुमारास त्याच्या भोसरीतील टाटा मोटर्स मटेरीयल गेटजवळील खासगी कंपनीत गेल्या. त्याला पकडून चोप दिला आणि भोसरी पोलिसांच्या ताब्यात दिले. फिर्यादी व आरोपी दोघे मूकबधिर असल्याने पोलिसांना त्यांच्याशी संवाद साधताना अडचणी येत होत्या. त्यामुळे तपासाला विलंब होत होता. संध्याकाळी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात चौकशीचे काम सुरू होते. नराधमाच्या मित्रांच्या मोबाइलवर या दोघांचे छायाचित्रे असल्याने त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. या संदर्भात भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, ‘‘चौकशी सुरू आहे. दोघे मूक बधिर असल्याने संभाषणास अवधी लागत आहे. चौकशी पूर्ण होताच गुन्हा दाखल केला जाईल.’’(वार्ताहर)