शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कचरावेचक मूकबधिर मुलीवर बलात्कार

By admin | Updated: July 1, 2017 07:55 IST

कचरावेचक मूकबधिर मुलीवर पैशाच्या आमिषाने वारंवार बलात्कार करून तिला गरोदर राहण्यास भाग पाडण्यात आल्याची घटना कोथरूड

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कचरावेचक मूकबधिर मुलीवर पैशाच्या आमिषाने वारंवार बलात्कार करून तिला गरोदर राहण्यास भाग पाडण्यात आल्याची घटना कोथरूड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पीडित मुलीचे आईवडील अंध आणि भाऊही मूकबधिर आहे. सहारुल इस्लाम अब्दुल वाहीद लष्कर ऊर्फ शाहरुख (वय २६, रा. आदर्श चौक, केळेवाडी, कोथरूड) असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मूळचा आसाममधील सिलचर जिल्ह्यातील पालगट दलाईखाना येथील रहिवासी आहे. त्याचे लग्न झालेले असून गेल्या चार वर्षांपासून तो पुण्यामध्ये राहण्यास होता. पीडित मुलगी १६ वर्षांची असून केळेवाडी परिसरात राहणारी आहे. तिचे कोथरूडमधील मूकबधिर विद्यालयात सातवीपर्यंत शिक्षण झाले आहे.आरोपीचे लग्न झाले असून, त्याची पत्नी गरोदर आहे. ही मुलगी कचरा वेचायला जात असताना आरोपीने तिला गाठले. तिच्याशी लगट करीत तिला पैशाचे आमिष दाखवले. तिला कोथरूड भागातील वारंवार बलात्कार केला. हा प्रकार मार्च महिन्याच्या आधी घडला होता.