शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॅकमेल करून शाळकरी मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 01:39 IST

कडूस (ता. खेड) येथील पंधरा वर्षीय शालेय मुलीवर अत्याचार करून त्याचे अश्लील चित्रण व्हायरल करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

राजगुरुनगर : कडूस (ता. खेड) येथील पंधरा वर्षीय शालेय मुलीवर अत्याचार करून त्याचे अश्लील चित्रण व्हायरल करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. गेल्या महिनाभरापासून हा प्रकार घडत असून पोलिसांनी बलात्कार, बाललैंगिक अत्याचारविरोधी कायदा, अ‍ॅट्रॉसिटीअन्वये गुन्हा दाखल केला आहे.सचिन रघुनाथ टोके (वय २०) आणि त्याचा साथीदार मयुर दगडु टोके (वय २३, दोघेही रा. कडूस) यांना खेड पोलिसांनी अटक केली आहे. खेड उपविभागीय पोलीस कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मावस बहिणीसोबत दहावी इयत्तेत शिकणाऱ्या तिच्या मैत्रिणीला आरोपीने ओळखीचा गैरफायदा घेत सेल्फी फोटो काढला. हा फोटो डिलीट करण्याच्या बदल्यात एकांतात नेऊन बलात्कार केला. यावेळी झाडाच्या आड लपून बसलेल्या मित्राने चित्रीकरण केले.त्यानंतर पुन्हा दोन आठवड्यांनी असेच आणखी फोटो डिलीट करण्याच्या निमित्ताने पुन्हा एकांतात बोलवले. पुन्हा तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या सर्व प्रकाराचे तेथे लपून बसलेल्या मयूर टोके याने मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. यानंतर हा व्हिडिओ तिला दाखवत ब्लॅकमेल करण्यात आले. व्हिडीओ व्हायरल करण्याची भिती घालत पुन्हा एकदा पीडितेवर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर वर्गामधील एका मुलीने आरोपीबरोबरचा अश्लिल व्हिडीओ पाहिल्याचे मुलीला सांगितले. तिने हा प्रकार घरी सांगितला. तिच्या आईने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.संशयित आरोपींना न्यायालयाने मंगळवारपर्यंत (दि. २५) पोलीस कोठडी दिली आहे. अधिक तपास उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे करीत आहेत.

टॅग्स :Molestationविनयभंग