शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम व्यावसायिकाच्या ऑफिस बॉयचे अपहरण करुन मागितली खंडणी; वारजेमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 10:14 IST

याप्रकरणी साईकमार शिवमुर्ती जावळकोटी (वय ५१, रा. सिंहगड रोड) यांनी वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पुणे : बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात काम करणार्‍या ऑफिस बॉयचे तिघांनी जबरदस्तीने अपहरण करुन त्याला सोडून देण्यासाठी खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आहे. याप्रकरणी वारेज पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार गण्या व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या ऑफिस बॉय म्हणून काम करणार्‍या मुलाने गुन्हेगारांचे भांडण सुरु असताना रात्री स्वत:ची सुटका करुन घेतली आहे. त्याला येरवड्यातील लक्ष्मीनगर येथील एका पत्र्याच्या खोलीत ठेवले होते. 

याप्रकरणी साईकमार शिवमुर्ती जावळकोटी (वय ५१, रा. सिंहगड रोड) यांनी वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ते बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे वारजे येथील कार्यालय आहे. १८ वर्षाचा धिरज ऑफिस बॉय म्हणून काम करतो. बुधवारी सकाळी तो शिवगंगा सोसायटीतील मायरा इनक्लेव्ह येथे आला असताना गण्या व त्याच्या दोन साथीदाराने धिरज याला जबरदस्तीने रिक्षामध्ये बसविले व येरवडा येथे जायचे असल्याचे सांगून त्याला घेऊन गेले.

त्यानंतर त्यांनी जावळकोटी यांना वेगवेगळ्या चार मोबाईलवरुन फोन करुन धिरजला सोडून देण्यासाठी २ लाख रुपयांची खंडणी मागितली. जावळकोटी यांनी तातडीने याची माहिती वारजे पोलिसांना दिली. पोलिसांनी धिरज याचा शोध सुरु केला. तेव्हा त्याला रिक्षातून पळवून नेल्याचे निष्पन्न झाले. धिरज याचा शोध सुरु असतानाच त्याने स्वत: या मुलांच्या तावडीतून सुटका करुन घेतली. 

या तिघा अपहरण करणार्‍यांनी त्याला येरवडा येथील लक्ष्मीनगर भागात एका खोलीत कोंडून ठेवले होते. तेथूनच त्यांनी जावळकोटी यांना फोन करुन खंडणी मागितली होती. त्यानंतर त्यांच्यात बोलाचाली सुरु असताना अचानक तिघे भांडू लागले. ही संधी साधून धिरज याने त्यांना धक्का देऊन त्यांना काही समजायच्या आत तेथून पळून आला. वारजे पोलिसांनी अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणे