शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

‘ग्रीन फेस्टिव्हल’मध्ये रमणबागेचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:08 IST

पर्यावरणाबाबत एकांकिकेतून जागृती : विविध सामाजिक समस्यांवर प्रकाश

पुणे : पर्यावरण विषयावर आधारित ग्रीन थिएटर फेस्टिव्हलमधील एकांकिका स्पर्धेत गतवर्षीप्रमाणे यंदाही रमणबाग प्रशालेने प्रथम पारितोषिक पटकावित आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक अहिल्यादेवी हायस्कूलने, तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक खडकी येथील रेंजहिल्स इंग्लिश मीडियम स्कूल व डी. ई. एस. सेकंडरी स्कूलला विभागून मिळाले. कर्वेनगर येथील महिला आश्रम हायस्कूलने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. पाण्याचे महत्त्व... कचरा व्यवस्थापन... वृक्षसंवर्धन... स्वच्छ भारत... प्लॅस्टिकबंदी... अशा विविध सामाजिक समस्यांवर एकांकिकेतून विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, इको फोक्स -मुंबई, युवा थिएटर्स चिंचवड, उन्नती ट्रस्ट या संस्थांच्या वतीने या एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृह येथे पार पडली. पारितोषिक वितरणप्रसंगी यशदाच्या उपमहासंचालक प्रेरणा देशभ्रतार, ज्येष्ठ रंगकर्मी प्रकाश पारखी, सुभाष तगारे, रोहित नागभिडे, परेश पिंपळे, इंद्रायणी पिसोळकर, विश्वनाथ जोशी, आबा शिंदे उपस्थित होते. पुणे शहरांतील विविध शाळांमधील इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. दीपाली निरगुडकर, नितीन धंदुके, नितीन सुपेकर यांनी अंतिम फेरीच्या स्पर्धेचे परीक्षण केले. प्रकाश पारखी म्हणाले, की नाटक हा एखादा विषय प्रभावीपणे मांडण्याचे उत्तम माध्यम आहे. पर्यावरण हा महत्त्वाचा विषय घेऊन नाटकांचे सादरीकरण झाले याचा आनंद आहे. नाटक करायचे असल्यास त्यामधील नाट्यशास्त्रदेखील समजून घेतले पाहिजे. अभिनयाबरोबरच वेशभूषा, रंगभूषा या गोष्टीदेखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत.

शोभा नरके यांनी सूत्रसंचालन केले. विश्वनाथ जोशी यांनी आभार मानले.महिला हायस्कूल द्वितीय, रेणुका स्वरूप तृतियपर्यावरणमित्र शाळा विभागात अहिल्यादेवी हायस्कूल प्रथम, महिलाश्रम हायस्कूल द्वितीय, रेणुका स्वरुप हायस्कूलने तृतीय क्रमांक पटकाविला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन रवींद्र सातपुते प्रथम, अनिता खैरनार द्वितीय आणि मीनल साकोरे व प्रीतम पिसरेकर यांना तृतीय क्रमांक मिळाला. लेखन विभागातील प्रथम क्रमांक अद्वैता उमराणीकर, द्वितीय क्रमांक संगीता कुलकर्णी आणि कांचन सोलापूरकर यांना तृतीय क्रमांक मिळाला. सर्वोत्कष्ट एकांकिका रुपये २५ हजार, द्वितीय क्रमांक २० हजार, तृतीय क्रमांक १५ हजार आणि चषक, प्रमाणपत्र अशी बक्षिसे प्रदान करण्यात आली. याशिवाय सर्वोत्कृष्ट अभिनेता रितेश वाघमारे, अभिनेत्री साक्षी कांबळे यांनादेखील पारितोषिके देण्यात आली.