शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुक्यातील राक्षेवाडी 'कंटेन्मेंट' तर राजगुरूनगर शहर 'बफर झोन' म्हणून घोषित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 12:43 IST

राक्षेवाडीत एक कोरोनाबाधित व्यक्ती आढळून आली आहे

ठळक मुद्देहाय रिस्क संपर्कात आलेले ११जण असुन त्यातील ५ जण जहांगीर तर ६ जण औंध रुग्णालयात दाखल३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यांने राक्षेवाडीकरांना थोडासा दिलासा

राजगुरुनगर: राक्षेवाडीत कोरोना बाधित व्यक्ती आढळुन आल्यावर आज पासुन राक्षेवाडीसह लगत असलेले राजगुरूनगर नगरपरिषदचे दोन वार्ड कंटेन्मेंट (संक्रमणशील) तर राजगुरूनगर शहर बफर झोन करण्यात आले. कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेला केश कर्तनवाला, कोरोनाग्रस्त रुग्णावर प्राथमिक उपचार करणारे खाजगी डॉक्टर, नर्स यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत तसेच कोरोनाग्रस्ताच्या पत्नीचे व दोन लहान मुलांचे रिपोर्ट संध्याकाळपर्यत हाती येतील. असे पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे यांनी सांगितले.राक्षेवाडीत एक कोरोना बाधित व्यक्ती आढळून आली आहे. त्यांच्या हाय रिस्क संपर्कात आलेले ११जण असुन त्यांतील ५ जण जहांगीर तर ६ जण औंध रुग्णालयात दाखल केले आहेत.बाधित व्यक्तीची पत्नी,त्यांची२ व भावाचा एक अशी तीन लहान मुले,भाऊ भावजय, आई,वडील केस कटिंगवाला व डॉक्टर यांचा समावेश होता.याशिवाय पत्नी निमगाव येथील एका कंपनीत नोकरी करते. या कंपनीतील २९ महिलापैकी ५ सहकारी कामगार महिला आणि त्यांचे वास्तव्य असलेल्या इमारतीच्या २२ फ्लॅट मधील ८७ जणांना त्यांच्या राहत्या घरी होम क्वारंटाइन केले आहे.संबंधित कंपनी गुरुवारी रात्रीपासून पूर्ण बंद ठेवण्यात आली आहे. रुग्ण आढळुन आल्याने पुणे नासिक महामार्गच्या पूर्वेकडे राक्षेवाडी व नगरपरिषदचे दोन वार्ड हा परिसर बफर झोन करन्यात आला आहे.या भागात नागरिकांना येजा करण्यास मज्जाव करण्यात आला येत आहे. येथे कोणत्याही दुकानांना उघडण्यास मनाई आहे. फक्त होम डिलिव्हरी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.या परिसरातील तीन हजार नागरिकांची खेड तालुका आरोग्य व आशा वर्कर यांच्या माध्यमातुन आरोग्य तपासणी करण्याचे काम सुरु असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी बळीराम गाढवे यांनी सांगितले. विभागीय पोलीस अधीक्षक गजानन टोम्पे,तहसीलदार सुचित्रा आमले,पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, राजगुरूनगर नगरपरिषद मुख्याधिकारी मच्छिद्र घोलप व कर्मचारी यांनी बंदोबस्त तैनात केला आहे.

टॅग्स :KhedखेडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस