पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा करून, या महाआघाडीतील सहभागाबाबत चर्चा केली. राज्यात होऊ घातलेल्या शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाशिवआघाडीवर शेट्टी यांनी प्रारंभी नाराजी व्यक्त केली होती. भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना शेट्टी यांनी, महाशिवआघाडीतील सहभागाविषयी तसेच आगामी संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी व पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतीला केंद्राकडून भरीव मदत मिळविण्यासाठी शेतीच्या समस्याविषयी पवार यांच्याशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले़
राजू शेट्टी यांनी घेतली शरद पवार यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 01:52 IST