शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

राजगुरुनगर-मंचर महामार्ग नव्हे, मंदमार्ग

By admin | Updated: July 10, 2015 01:12 IST

पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर राजगुरुनगर ते मंचरदरम्यान वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे महामार्ग चर्चेत आला आहे.

पेठ : पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर राजगुरुनगर ते मंचरदरम्यान वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे महामार्ग चर्चेत आला आहे. या मार्गावर होणारे अपघात व वाहतूककोंडी यांमुळे वाहतूक मंदावत आहे. चौपदरीकरणाचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी वाहनचालक व प्रवासी करीत आहेत.वाहतूक खात्याचे दुर्लक्ष व वाहतुकीच्या नियमांचे पालन न करण्याची वाहनचालकांची प्रवृत्ती यांमुळे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची संख्या वाढतच चालली आहे. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या वाढतच आहे. या अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या किंवा गंभीर जखमी होणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याचे लक्षात येते. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर वेगाने वाढणाऱ्या चार ते पाच वर्षांच्या तुलनेत सध्या वाहनांची संख्या ही वाढतच आहे. या महामार्गावर वेगाने वाढणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीला मर्यादा पडत आहेत. त्यातच अवजड वाहनांचे प्रमाणदेखील प्रचंड वाढले आहे. त्यामुळे या घाटात वारंवार अपघात होतात. या दोन्ही घाटांतील रस्ता हा अरुंद असून वळणे नागमोडी आहेत. त्यामुळे सध्या पडलेले खड्डे चुकवण्याच्या नादात या ठिकाणी अपघात होतात. खेड घाटात तर दरड कोसळण्यासारखे प्रकारदेखील घडत आहेत. पुणे ते आळेफाट्यादरम्यान औद्योगिक क्षेत्राचा विस्तार प्रचंड वेगाने होत आहे. पुणे ते नाशिक रेल्वेमार्ग झाल्यास रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. परंतु, ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. (वार्ताहर)> लग्नसराईच्या हंगामात राजगुरुनगर व मंचर येथे वाहतुकीच्या खोळंबा होतो. अवजड वाहने व कंटेनर यांना दिवसा या महामार्गावरून ये-जा करण्यास बंदी घालावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत. काही दिवसांपासून या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा या ठिकाणी रस्त्यालगत असलेली अतिक्रमणे काढण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाने सपाटाच लावला आहे. लवकरात लवकर या महामार्गाचे संपूर्ण चौपदरीकरण झाल्यानंतर अपघातांच्या संख्येत निश्चितच घट होईल व अपघातांमध्ये जाणारे जीव वाचतील व नागरिक-प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येईल.