शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राजेंद्र जगताप स्मार्ट सिटीचे सीईओ

By admin | Updated: June 30, 2017 04:07 IST

महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांची पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे : महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांची पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेतून त्यांची बदली होऊन त्यांना पुणे महानगर परिवहन (पीएमपी)च्या व्यवस्थापकपदी नियुक्त करण्यात आले होते. मात्र, ते तिथे हजर झालेच नाहीत व आता त्यांची नियुक्ती पुणे स्मार्ट सिटीत झाली आहे.आपण लवकरच रुजू होणार आहोत, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अन्य काही बोलायला त्यांनी नकार दिला. सध्या स्मार्ट सिटीच्या सीईओ म्हणून महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे. या पदावर राज्य सरकारने अमित सैनी या आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती; मात्र ते या पदावर हजर झालेच नाहीत. त्यामुळे संचालक मंडळाच्या बैठकीत अतिरिक्त कार्यभार पुन्हा देशभ्रतार यांच्याकडे देण्यात आला. आता राजेंद्र जगताप त्यांच्याकडून या पदाची सूत्रे स्वीकारतील.जगताप लष्कराच्या छावणी मंडळाच्या (कॅन्टोन्मेंट) सेवेत होते. तिथून त्यांची प्रतिनियुक्तीवर पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली. सलग ५ वर्षे (फक्त एक महिना बाकी) ते या एकाच पदावर कार्यरत होते. या पदावर आयएएस अधिकारी असणे आवश्यक असताना त्यांच्याकडे कार्यभार देण्यावरून काही स्वयंसेवी संस्थांनी हरकत घेतली होती. ३ वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतरही ते त्याच पदावर असल्यामुळेही चर्चा होत होती; मात्र पुढे काही झाले नाही.महापालिकेतील त्यांच्या कार्यकाळाला ५ वर्षे होण्यास एक महिना बाकी असताना साधारण दोन महिन्यांपूर्वी त्यांची महापालिकेतून बदली झाली. त्यानंतर बरेच दिवस त्यांना कुठेही नियुक्ती दिलेली नव्हती. साधारण महिनाभरापूर्वी त्यांना पीएमपीचे व्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आले. व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्या कामामुळे गाजत असलेल्या पीएमपीमध्ये जगताप हजरच झाले नाहीत. आता त्यांना पुन्हा पुण्यातच व तेही महापालिकेशी संबंधित असलेल्या स्मार्ट सिटी कंपनीत सीईओ म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते व माजी मंत्री पतंगराव कदम यांचे जगताप हे जावई आहेत. पतंगराव कदम यांचे सध्याच्या भाजपाप्रणीत सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांपासून अनेक वरिष्ठ मंत्र्यांशी निकटचे संबध आहेत. त्यामुळेच एखाद्या पदावरचा कार्यकाळ संपला तरी जगताप यांची बदली होत नाही, तसेच त्यांना हवा तो कार्यभार दिला जातो, अशीही चर्चा आहे.