शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांवर पर्जन्य राजा प्रसन्न, पावसाने ओलांडला ६०० मिमीचा पल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:42 IST

दोन वर्षांपूर्वी पाणी टंचाईची झळ सोसणा-या पुणेकरांवर यंदा पर्जन्यराजा अधिकच प्रसन्न झाला असून पावसाळ्यात पडणा-या पावसापेक्षा तब्बल १३०़८ मिमी जादा पाऊस आतापर्यंत झाला आहे़

पुणे : दोन वर्षांपूर्वी पाणी टंचाईची झळ सोसणा-या पुणेकरांवर यंदा पर्जन्यराजा अधिकच प्रसन्न झाला असून पावसाळ्यात पडणा-या पावसापेक्षा तब्बल १३०़८ मिमी जादा पाऊस आतापर्यंत झाला आहे़ शहरातील पावसाने ६०० मिमीचा पल्ला ओलांडला असून अजून पावसाळ्याचे जवळपास १२ दिवस बाकी आहेत़ पुणे शहराची वार्षिक सरासरी ७४० मिमी इतकी असून आतापर्यंत ६२१ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ हा पाऊस सरासरीपेक्षा १३़८ मिमीने जास्त आहे़यंदा मान्सून नेहमीपेक्षा थोडा उशिरा आला असला तरी जूनमध्ये तो धो धो कोसळला़ जूनच्या शेवटचे काही दिवस तसेच जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने ओढ दिली होती़ त्यानंतर पुन्हा एकदा पाऊस बरसू लागला़ जुलै महिन्यात पावसामध्ये सातत्य राहिले़ जुलै महिन्यात १९४़२ मिमी पावसाची नोंद झाली होती़ पुणे शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला धरण साखळीमधील चारही धरणातील पाणीसाठा ९० टक्क्यांच्या पुढे गेल्याने नदीतून पाणी सोडण्याची वेळ आली होती़बंगालच्या उपसागरात सातत्याने निर्माण झालेले कमी दाबाचे पट्टे आणि त्याच्या जोडीला अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा यामुळे पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी सप्टेबर महिन्यातही चांगला पाऊस होत आहे़ सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून कोकण ते केरळपर्यंत हवेच्या दाबाचे कुंड तयार झाले आहे़ त्यामुळे पुढील काही दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र तसेच पुणे परिसरात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे पुढील काही दिवसात पुणे शहराची वार्षिक सरासरी पूर्ण केली जाऊ शकेल़>शहराच्या अनेक भागात सध्या पाऊस पडत असला तरी हवामान विभागाच्या शिवाजीनगर येथील निरीक्षक केंद्रात पडलेला पावसाचीच मोजणी होते़ त्यामुळे तेथे पडलेला पाऊस हा शहराचा पाऊस गृहीत धरला जातो़>या वर्षीचा पाऊस (मिमी)जून २०७़८जुलै १९४़२आॅगस्ट १६२़२१८ सप्टेंबरपर्यंत ५७़१