पुणे : पावसामुळे शेवंती फुलाला फटका बसला आहे. बाजारात ओल्या मालाची आवक जास्त झाल्याने भाव कमी मिळत आहे. त्यामुळे फुलबाजारात रविवारी शेवंती फुलाबरोबर इतर फुलांच्या व्यापाराला मोठा फटका बसला. वीकेंड लॉकडाऊनमुळे देखील मागणी कमी होती.
कोरोनामुळे सध्या मंदिरे बंद असल्याने फुलांना मागणीही कमी आहे. मंदिरे उघडल्यानंतर मागणी वाढेल. गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू असल्याचा फटका बसत आहे.
प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे :-
झेंडू : २०-४०, गुलछडी : ३०-५०, कापरी : २०-३०, शेवंती : ३०-७०, आॅस्टर : (सुट्टा) १००-१२० (जुडी) १५-२५, गुलाबगड्डी (बारा नगाचे दर) : २०-४०, गुलछडी काडी : १०-३०, डच गुलाब (२० नग) : ५०-१००, लिलियम (१० काडी) : ६००-८००, जर्बेरा : २०-४०, कार्नेशियन : ६०-१००, शेवंती काडी : ६०-१२०, लिलियम (१० काड्या) : ६००-८००, आॅर्चिड : ६०-१५०, ग्लॅडिओ : ३०-७०.