शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

भातपिकाला पावसाने जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:17 IST

पंधरवड्यानंतर पुनरागमन : बळीराजा आनंदी

भोर : सुमारे १५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर भोर तालुक्यात दोन दिवस दमदार पाऊस झाला. भातपिकाला त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. भात हे भोर तालुक्यातील प्रमुख पीक आहे. भाताची ५० हेक्टरवर रोपवाटिका करून सुमारे ७५०० हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. गेल्या १५ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने भातखाचरातील पाणी आटले होते. परिणामी पिकाला अन्नद्रव्याची कमतरता जाणवून वाढीवर विपरीत परिणाम होत होता.

पिकावर विषाणूजन्य करपा व बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती असल्याने शेतकरी आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत होते. मात्र गेल्या दोन दिवसांत रात्री झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. तालुक्यात इंद्रायणी, बासमती, फुले समृद्धी, रत्नागिरी २४, कर्जत आंबेमोहोर, तामसाळ या हळव्या आणी गरव्या जातीच्या भाताची लागवड केली जाते. सध्या भात पोसण्याची वेळ असताना पावसाअभावी डोंगर उतारावरील झरे आटले, तसेच ओढ्या, नाल्यांचे पाणीही आटले होते. त्यामुळे भातावर काही ठिकाणी जिवाणूजन्य करपा व काही भागात विषाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. अनेक ठिकाणी भाताच्या ओंब्या बाहेर पडत असताना पाणी नसल्याने दाणे भरण्यास अडचण होणार होती.अचानक पावसाने मारली दडीतालुक्यात भाताची ७५०० हेक्टरवर लागवड झाली असून त्यातील ५० एकरवर यंत्राद्वारे लागवड करण्यात आली आहे. वेळेवर पाऊस झाल्याने १०० टक्के भाताची लागवड झाली होती. भाताचे पिक जोमात होते. त्यामुळे उत्पादनात वाढ होईल, असे वाटत असताना अचानक पावसाने दडी मारली होती. पिकावर त्याचे दुष्परिणाम जाणवत होते.

टॅग्स :Puneपुणे