शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

हडपसरमध्ये तुटले रेल्वे फाटक ; दोन किलोमीटरवर वाहनांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 14:34 IST

ससाणेनगर येथील रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूलासाठी निधी मंजूर केला होता. त्यानंतर भुयारी मार्ग करायचा असा सूर काढल्याने सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकीय स्पर्धेत  उड्डाणपुलाचे घोंगडे भिजतच राहिले.

ठळक मुद्देनागरिकांचे प्रचंड हाल : चाळीस लाख खर्चूनही प्रश्न कायममागील काही दिवसात तिसऱ्यांदा हे फाटक तुटण्याची घटना

हडपसर : ससाणेनगर व सय्यदनगरला जोडणाऱ्या रेल्वे क्रॉसिंगचे फाटक तुटल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मागील काही दिवसात तिसऱ्यांदा हे फाटक तुटण्याची घटना घडली असून परिसरातील नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास रेल्वे आली असता रेल्वे मार्गावरील गेट कर्मचारी उघडायला गेले. तेव्हा हे गेट तुटून पडले. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे नागरिक हैराण झाले होते. जवळपास दीड तास या गेटची दुरुस्ती सुरु होती.  वाहतूक पोलीस उपस्थित असल्याने परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मदत झाली. अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे येथे नागरिकांना वारंवार त्रास सहन करावा लागत आहे. वाहतुककोंडीच्या घटनेत वाढ झाली आहे. रेल्वे गेट रुंदीकरण करण्यासाठी नूतनीकरण करून ४० लाख खर्च करूनसुद्धा या समस्येला सामोरे जावे लागत असल्यामुळे तेथील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. .............ससाणेनगर येथील रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूलासाठी निधी मंजूर केला होता. त्यानंतर भुयारी मार्ग करायचा असा सूर काढल्याने सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकीय स्पर्धेत  उड्डाणपुलाचे घोंगडे भिजतच राहिले. ससाणेनगरच्या या गेटच्या समस्येवर उपाय म्हणून काळेपडल येतील गेटमधून वाहतूक वळविण्यात आली. मात्र, तरीसुध्दा रस्त्यावर सुमारे २ किलोमीटरच्या पुढे रांग लागल्या.  

टॅग्स :Hadapsarहडपसरrailwayरेल्वेTrafficवाहतूक कोंडी