शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सभापती रघुनाथ लेंडेंवर गैरव्यवहाराचा ठपका

By admin | Updated: May 11, 2017 04:06 IST

महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथ लेंडे यांच्यावर मनमानी कारभार व अनेक

लोकमत न्यूज नेटवर्कनारायणगाव : महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथ लेंडे यांच्यावर मनमानी कारभार व अनेक गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवून १९ पैकी उपसभापतींसह दिलीप डुंबरे यांच्यासह १४ सदस्यांनी अविश्वासाचा ठराव दाखल केला आहे़ अविश्वास ठराव दाखल झाल्याने राष्ट्रवादीचे युवा नेते अतुल बेनके यांचे वर्चस्व असलेल्या या बाजार समितीमध्ये संचालकांची फाटाफूट झाल्याने त्यांना मोठा फटका बसणार आहे़ राष्ट्रवादीचे नेते व बाजार समितीचे विद्यमान संचालक अ‍ॅड. संजय काळे यांच्यासोबत १४ सदस्य असल्याने काळे यांचे पुन्हा एकदा बाजार समितीवर वर्चस्व राहण्याची शक्यता सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येते.बाजार समितीवर गेल्या ५४ वर्षांपासून सहकार महर्षी शिवाजीराव काळे व त्यांचे पुत्र अ‍ॅड़ संजय काळे यांचे वर्चस्व होते. शिवसेना व अ‍ॅड. काळे यांच्यात गेल्या दोन निवडणुकांपासून युती होती़ दीड वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीतदेखील अ‍ॅड. काळे यांनी शिवसेनेशी युती केली होती; परंतु अतुल बेनके यांनी खेळी करून अजित पवार व दिलीप वळसे-पाटील यांना शिवसेनेशी युती तोडण्यास भाग पाडून अ‍ॅड. काळे यांनी स्वतंत्र पॅनल करावा व अतुल बेनके यांच्याशी मिळतेजुळते घ्यावे, असा आदेश अजित पवार यांनी दिला होता़ अ‍ॅड. काळे यांनी वरिष्ठांचा आदेश पाळून शिवसेनेशी युती तोडली व राष्ट्रवादीचे पॅनल केले़ दुसरीकडे, अतुल बेनके यांनी शिवसेनेशी हातमिळवणी करून राष्ट्रवादीतील उमेदवारांना बंडखोरी करण्यास भाग पाडले़ या निवडणुकीत अ‍ॅड. काळे यांच्या पॅनलला फटका बसून त्यांचे १९ पैकी ७ उमेदवार निवडून आले़ बेनके गटाचे ८ उमेदवार निवडून आले़ तर, शिवसेनेचे ४ उमेदवार निवडून आले. बेनके यांनी शिवसेनेशी युती करून सभापती राष्ट्रवादीचा व उपसभापती शिवसेनेचा असे निश्चित होऊन सभापतिपदी रघुनाथ लेंडे, तर उपसभापतिपदी दिलीप डुंबरे यांची निवड झाली. काही महिन्यांच्या कालावधीत सभापती रघुनाथ लेंडे हे संचालकांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात, तसेच संचालक मंडळांना अंधारात ठेवून महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत.