शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:11 IST

पुणे : तू आमच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार करतो का?, आता तुला खल्लास करतो असे म्हणत दोघा जणांनी ...

पुणे : तू आमच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार करतो का?, आता तुला खल्लास करतो असे म्हणत दोघा जणांनी तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून हा प्रकार घडला. याप्रकरणी दोघांना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी ही घटना रामटेकडीतील मगरीन बाई चाळ परिसरात घडली.

शुभम कांबळे (वय १९) आणि अजय उकीरडे (वय ३०, दोघेही रा. रामटेकडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विकास चव्हाण (वय २५, रा. रामटेकडी ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यानेच वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आरोपींनी विकास चव्हाण यांच्या भावावर कोयत्याने वार केला होता. त्यामुळे विकासने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याचा राग आरोपींना होता. दोन दिवसांपूर्वी विकास हे त्यांचा भाऊ आणि मामा यांच्यासह दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी जुन्या भांडणाच्या रागातून आरोपींनी विकासला अडवून त्याच्यावर कोयत्याने वार केला. भांडणात मध्यस्थी केल्यामुळे आरोपींनी भाऊ आणि मामालाही धमकी दिली. त्याशिवाय हातातील कोयता हवेत फिरवून आम्ही रामटेकडीचे दादा आहोत, जो कोणी आमच्या नादाला लागेल, त्याला आम्ही खल्लास करू, असे ओरडून परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भूषण पोटावडे तपास करीत आहेत.