शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूककोंडीने चाकणकर रडकुंडीला

By admin | Updated: January 13, 2017 02:09 IST

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूककोंडीने चाकणकर नागरिक अक्षरश: रडकुंडीला आले असून

चाकण : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूककोंडीने चाकणकर नागरिक अक्षरश: रडकुंडीला आले असून, चाकणमधील वाहतूककोंडी थांबणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत असल्याने चाकणला उड्डाणपुलासह रस्त्याचे नव्याने रुंदीकरण करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.वाढती लोकसंख्या, परप्रांतियांचे आक्रमण, वेगाने वाढणारी रहदारी, अपुरे पडणारे रस्ते, सर्वसामान्याना भंडावून सोडणारे अतिक्रमण, चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आलेले उड्डाणपूल व उद्योगाची पंढरी समजल्या जाणाऱ्या छोट्या-मोठ्या कारखान्यांमुळे येथील चौकाचौकांत वाहतूककोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे चाकणकरांचा श्वास गुदमरत असून, वाढत्या वाहतूककोंडीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.येथील आंबेठाण चौकालगत व तळेगाव चौकालगत बांधण्यात आलेल्या उड्डाणपूलाचा रहदारीसाठी काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे नागरिक अक्षरश: रडकुंडीला आले आहेत. शहरातील रस्ते पूर्णपणे खड्ड्यात गेल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. चाकण-तळेगाव रस्त्यावर महाळुंगे गावाच्या हद्दीत ब्लॅक अँड डेकर बजाज व कला जनसेट कंपनीसमोर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे तळेगाव रस्त्यावर अपघाताचा धोका निर्माण झाला असून वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. (वार्ताहर) अपुरे रस्ते, सिग्नलयंत्रणा नादुरुस्त, चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आलेले उड्डाणपूल तसेच दिशादर्शक फलकाचा अभाव आदींमुळे सुपातील केव्हा जात्यात जातील, याचा थांगपत्ता लागत नाही, त्यामुळे चाकणकरांच्या अस्तित्वाचा व अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला आहे.  रस्ते दुरूस्त करू, नव्याने उड्डाणपूल बांधू, वाहतूककोंडीवर नियंत्रण ठेवू, असे नुसते आश्वासनाचे गाजर दाखवले जाते आहे. मात्र प्रत्यक्षात याची दखल घेतली जात नाही, असा आरोप नागरिकांकडून होत आहे. चाकण-तळेगाव चौक हा पुणे-नाशिक  महामार्ग व मुंबई ते अहमदनगर या रस्त्याला जोडणारा महामार्ग आहे. मात्र रस्त्यांचे रुंदीकरण व चुकीच्या उड्डाणपुलामुळे वाहतूककोंडी केव्हा होईल, याचा थांगपत्ता लागत नाही.  हे उड्डाणपूल असून अडचण, नसून खोळंबा, अशी स्थिती असल्याने महामार्गावरील रस्त्यांवर चाकणच्या हद्दीत नव्याने मोठे उड्डाणपूल बांधावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.