शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

निवडणुकीदरम्यान शहरात विविध ठिकाणी ‘राडा’

By admin | Updated: February 22, 2017 03:35 IST

महापालिकेची यंदाची निवडणूक जशी पैशांचा महापूर, फोडाफोडीचे राजकारण यामुळे गाजली, तशीच ती प्रत्यक्ष

पुणे : महापालिकेची यंदाची निवडणूक जशी पैशांचा महापूर, फोडाफोडीचे राजकारण यामुळे गाजली, तशीच ती प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी शहरात घडलेल्या घटनांमुळेही गाजली. बालेवाडी, पिंपरी-चिंचवडमधील मारामारी आणि वाहनांच्या तोडफोडीच्या घटनांमुळे तणाव निर्माण झाला होता. यासोबतच धनकवडी, कोरेगाव पार्क, दत्तवाडी आदी भागांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या किरकोळ वादावादी आणि धक्काबुक्कीमुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अनेक ठिकाणी पोलिसांसोबत कार्यकर्ते हुज्जत घालत होते. अनेकांना पोलिसांनी बकोटीला धरून पोलीस चौकीमध्ये चौकशीसाठी नेले होते. दिवसभरामध्ये जवळपास सव्वाशे कॉल पोलिसांना आले होते. नियंत्रण कक्षामधून संबंधित पोलीस ठाण्यांना याची माहिती कळवण्यात येत होती. परंतु, बरेचशे कॉल खोटे असल्याचे दिसून आल्याची माहिती सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी दिली. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला आणि सह पोलीस आयुक्त सुनिल रामानंद यांनी स्वत: मतदान केंद्रांवर भेट देऊन पाहणी केली. पिंपरी चिंचवडमध्ये काही ठिकाणी पोलिसांनी किरकोळ लाठीमार केला. यासोबतच जागोजागी परस्पर विरोधी कार्यकर्ते समोरासमोर येणार नाहीत याचीही काळजी घेण्यात येत होती. किरकोळ घटना वगळता शहरात शांततेत मतदान झाले आहे. पोलिसांचा सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वावर होता. तसेच आमचा रिस्पॉन्स टाइमही पाच मिनिटांपेक्षा कमी होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार टाळण्यात यश आले. शहरातील महत्त्वाच्या मतदान केंद्रांना मी स्वत: भेट देऊन पाहणी केली. सर्व बंदोबस्त आणि प्रक्रियेवर मी स्वत: बारीक लक्ष ठेवून होते. - रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्तविविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखलसहकारनगर पोलीस ठाणेधनकवडी येथील समर्थ बालवाडीजवळ काही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. जिल्ह्यामधून काही तरुणांना बोगस मतदानासाठी आणण्यात आल्याच्या संशयावरून वाद उफाळला होता. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. दत्तवाडी पोलीस ठाणेराष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी गदादे यांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद नितीन कैलास हनमघर यांनी दत्तवाडी पोलीस चौकीमध्ये दिली आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. स्वारगेट पोलीस ठाणेप्रभाग क्रमांक २८ मधील भाजपाचे काही कार्यकर्ते मतदान यंत्रांची डमी घेऊन जात होते. या डमी मशीनवर भाजपाच्या चारही उमेदवारांची माहिती मतदारांना देण्यात येत होती. पोलिसांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना बोलावून हे साहित्य ताब्यात घेतले. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी राजेंद्र मांगीलाल नागोरी आणि किरण मेहता यांच्याविरुद्ध कलम 188 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मनपाचे संजय दत्तात्रय कुंभार यांनी फिर्याद दिली आहे.सिंहगड रोड पोलीस ठाणेबेकायदेशीरपणे ६४ हजार ७00 रुपयांची रोकड बाळगत मतदारांना आमिष दाखवल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आनंदा बाजीराव शेंडगे (वय ५0, रा. पर्वती) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विलास लक्ष्मण कांबळे, (रा. सनसिटी), राजेश दत्तात्रय भुवड (रा. हिंगणे), अनिल कुदळे (रा. हिंगणे), पंकज युवराज चव्हाण (रा. कोल्हेवाडी), योगेश्वर विनायक पाटील (रा. कोल्हेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आठ गाड्या ताब्यातकोंढव्यातील प्रभाग क्रमांक ४१ मध्ये बोगस मतदार असल्याच्या संशयावरून पोलिसांनी एका स्कूलबससह सात जीप पकडल्या. त्यामध्ये एकूण ४0 नागरिक होते. त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. निवडणूक अधिका-यांना कळवण्यात येणार असून त्यांची चौकशी करुन सोडून देण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक सतीश गोवेकर यांनी दिली.हिंजवडी पोलीस ठाणेराष्ट्रवादी काँग्रेसचे बाबूराव चांदेरे आणि शिवसेनेचे राजेंद्र धनकुडे यांच्यामध्ये झालेल्या वादामधून मोठ्या प्रमाणावर वाहनांची तोडफोड करण्यात आली. उपनिरीक्षक मोहन जाधव यांच्या फिर्यादीवरुन बाबूराव दत्तोबा चांदेरे आणि त्यांचा भाऊ राजेंद्र दत्तोबा चांदेरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांदेरे बंधूंना मतदारांनी मत द्यावे याकरिता मतदारांना केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करून प्रलोभन दाखवत आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर राजेंद्र चांदेरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवसेनेच्या उमेदवार रोहिणी राजेंद्र धनकुडे यांचे पती राजेंद्र धनकुडे, राहुल धनकुडे, शहाजी मुरकुटे, अविनाश घोटकुले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांदेरे यांच्या कार्यकर्त्यांनी आणलेल्या वाहनांची धनकुडे, मुरकुटे आणि घोटकुले यांनी तोडफोड करीत पाच मोटारींचे नुकसान केले. नियंत्रण कक्षाला दिवसभरात १२० कॉलपोलीस नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी पैसे वाटपाच्या कॉलने खणखणत होते. दिवसभरात तब्बल १२0 कॉल्स नियंत्रण कक्षामध्ये आले. त्यामध्ये, शहरात मतदानाच्या ठिकाणी गोंधळ सुरू आहे. या ठिकाणी पैसेवाटप सुरू आहे, दोन विरोधी गटांत बाचाबाची सुरू आहे, अशा आशयाचे कॉल होते. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पडताळणी केली असता त्यामध्ये तथ्य आढळून आले नाही. यातील ८५ ते ९० कॉल हे पैसे वाटप सुरू असल्याचे होते.