शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

दिव्यांगांना पदोपदी अडथळ्यांची ‘शर्यत’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 15:32 IST

शहरात ठिकठिकाणी सहन करावा लागतो त्रास

ठळक मुद्दे योग्य उपाययोजना करण्याची मागणीशासकीय आणि निमशासकीय इमारती दिव्यांगांना ये-जा करण्यासाठी युझर फ्रेंडली असाव्यात, असे बंधनकारक

पुणे : दिव्यांग व्यक्तींना शहरातील अनेक ठिकाणी इच्छा असूनही जाता येत नसल्यामुळे त्यांची कुचंबणा होत आहे. खरं तर प्रत्येक ठिकाणी दिव्यांगाना ये-जा करता येईल, अशी व्यवस्था करण्यासाठी सरकारच्या सूचना आहेत. परंतु, त्याकडे अनेक ठिकाणी दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत काही तक्रार करण्यासाठीची सोयदेखील नसल्याने दिव्यांग व्यक्तींची उपेक्षा होत आहे. जन्मजात किंवा नंतर अपघातात अपंगत्व आलेल्या व्यक्तींना सरकारकडून दिव्यांग   म्हणून संबोधले जात आहे. त्यांच्यासाठी अनेक योजनाही सुरू आहेत. प्रत्येक शासकीय आणि निमशासकीय इमारती दिव्यांगांना ये-जा करण्यासाठी युझर फ्रेंडली असाव्यात, असे बंधनकारक आहे. तसेच खासगी सार्वजनिक ठिकाणेदेखील त्यांना सहजरीत्या वावरता यावे, यासाठी बनविणे आवश्यक आहे. पण अनेक ठिकाणी आजही दिव्यांगांना जात येत नाही. कारण तिथे गेल्यानंतर व्हीलचेअर किंवा स्लोप करण्यात आलेला नसतो. परिणामी दिव्यांगांना निराश होऊन घरी परत जावे लागते. महापालिकेच्या शहरात शंभरहून बागा आहेत. त्या सर्व बागांमध्ये व्हीलचेअर असेल तर दिव्यांगसुद्धा तिथे जाऊन आनंद लुटू शकतात. पण बºयाच बागांमध्ये अशी व्यवस्था नाही. काही खासगी बागांमध्ये, मंदिरांमध्ये तशी सोय नाही. सारसबाग, महाराणा प्रताप उद्यान, एम्प्रेस गार्डन, मोठमोठे मॉल, वानवडीमधील शिवरकर उद्यान, वडगावशेरीमधील उद्यान अशी अनेक उद्याने आहेत ज्या ठिकाणी व्हीलचेअरची सोय नाही. या ठिकाणी तशी सोय व्हावी, अशी मागणी दिव्यांगांनी केली आहे. .......पु. ल. देशपांडे उद्यानात असूनही देतात नकार नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) पु. ल. देशपांडे या उद्यानात व्हीलचेअरची सोय आहे. परंतु, तेथील कर्मचारी मात्र त्याची विचारणा केली असता थेट नाही म्हणून सांगतात. खंर तर या ठिकाणी महापालिकेतर्फे चांगल्या प्रतीची व्हीलचेअर दिलेली आहे. तसेच नुकतीच शिवराय प्रतिष्ठान या संस्थेनेही व्हीलचेअर भेट दिली आहे. तरीदेखील दिव्यांगांना नकार ऐकावा लागतो. जेव्हा महापालिकेच्या वरिष्ठांना याबाबत फोनवरून विचारणा केली जाते, तेव्हा येथील कर्मचारी व्हीलचेअर आणून देतात. त्यामुळे महापालिकेच्या उद्यान विभागातील अधिकाºयांनी याबाबत सर्व कर्मचाºयांना दिव्यांगांना व्हीलचेअर उपलब्ध करून दिलीच पाहिजे, अशी सक्त ताकीद देणे आवश्यक आहे. ..........योग्य सोय नसल्याने बागेत, चित्रपटगृहात, मंदिरात आम्हाला जाता येत नाही. एकटी असेल, तर जाणं अशक्यच असते. पायºया आणि खडबडीत रस्ते आमच्या रस्त्यात आडवे येतात. अगदी कुठे बाहेर वॉशरूमला जायचे झालं तरी उपलब्ध नसते. बस, रेल्वेचे दरवाजे खूप छोटे असतात, त्यातून व्हीलचेअर आत जात नाही. त्यामुळे आम्हाला मदतनीसाला उचलून घ्यावे लागते. बºयाच कॅब व्हीलचेअर घ्यायला नकार देतात, म्हणून खूप त्रास सहन करावा लागतो. - कोमल माळी, दिव्यांग खेळाडू  

टॅग्स :PuneपुणेDivyangदिव्यांगGovernmentसरकार