शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दापोडीत भाजी मंडईचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: May 29, 2017 02:36 IST

दापोडी गावठाणात भाजी मंडई मुख्य रस्त्यावरच भरते. मंडईसाठी पर्यायी जागा नसल्याने गुंता वाढत आहे. मंडईजवळच रेल्वेफाटक

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळे गुरव : दापोडी गावठाणात भाजी मंडई मुख्य रस्त्यावरच भरते. मंडईसाठी पर्यायी जागा नसल्याने गुंता वाढत आहे. मंडईजवळच रेल्वेफाटक आहे. त्यामुळे दररोज सकाळी व सायंकाळच्या वेळी वाहतुकीची समस्या भेडसावत आहे. पुणे-मुंबई महामार्गावरून दापोडी गावात जाण्यासाठीच्या प्रवेशद्वारापासून ते रेल्वे फाटकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजी मंडई भरते. दापोडीचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत १९९७ मध्ये समावेश झाला. तत्पूर्वी १९६७ पासून हे गाव पुणे महापालिकेत होते. तेव्हापासून येथील भाजी मंडईचा प्रश्न सुटलेला नाही. दापोडीत बंदिस्त भाजी मंडईची गरज आहे. वाहनतळासाठी स्वतंत्र व्यवस्था हवी. पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहाची गरज आहे. वाहतुकीला अडथळा होत असल्याने रस्त्यावर भाजी मंडई नको, असे वाहनचालकांचे मत आहे. यासाठी महापालिकेच्या प्रशासनाने व स्थानिक लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. दापोडी ते गणेश गार्डन हा उड्डाणपूल झाला असला तरी त्या पुलावर नागरिकांना ये-जा करण्यासाठी जवळचा रस्ता म्हणून भाजी मंडईच्या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. लोकसंख्याचे प्रमाण वाढत असतानाही त्या प्रमाणात सुविधांचा आभाव दिसून येत आहे. त्यामुळे रहिवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शितळादेवी चौकातही रस्त्यावरच हातगाडीवाले आपले ठाण मांडतात. जवळच चर्च असल्याने जास्तीची वाहतूककोंडीत भर पडते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व शाळकरी मुलांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या या भाजी मंडई आणि वाहणतळाची समस्या कायमची निकालात काढावी, अशी येथील रहिवाशांकडून मागणी होत आहे. दापोडीचा समावेश पुणे व नंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेत झाला. या दोन्ही महापालिकेकडे भाजी मंडईसाठी वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र, प्रश्न सुटलेला नाही. येथून जवळच रेल्वे क्रॉॅसिंग असल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे मंडईसाठी महापालिका प्रशासनाने तातडीने जागेची व्यवस्था करावी. मी समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. - माई काटे, नगरसेविका.दापोडीमध्ये सर्व्हे क्रं. ८५ येथे किरकोळ बाजारासाठी १० गुंठ्याचे आरक्षण आहे. मात्र, ती जागा अद्याप महापालिकेच्या ताब्यात मिळालेली नाही. भाजी मंडईसाठी स्वतंत्र आरक्षण नसून किरकोळ बाजाराच्या आरक्षणात व्यापारी गाळे व भाजी मंडई करणे शक्य आहे.- राजू बनसोडे, नगरसेवक.भाजी मार्केटची सोय नसल्याने भाजी विके्रत्यांना रस्त्यावरच बसावे लागते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. ग्राहकांना वावरणे मोठे जिकीरीचे होते. शाळकरी मुलांना ये-जा करणे धोकादायक आहे. -विजया झाडबुके, ग्राहक परिसरात भाजी मंडईची सोय नाही. जवळपास पिण्याचे पाणी नाही. स्वच्छतागृहाची सोय नाही. या रस्त्यावरून चारचाकी (मोटारी) वाहनांची वाहतूक बंद करायला हवी. म्हणजे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. -गोपाळ मोरे, दापोडी.भाजी मंडईसाठी शिवाजी पुतळ्यासमोर आणि गणेशनगर येथील काटे पेट्रोल पंपाजवळील जागा सुचविण्यात आली होती. त्या जागेबाबत निर्णय झालेला नाही. निर्णय घेतल्याने अनेक प्रश्न सुटणार आहेत.-अविनाश पांजाळे, फळविके्रता.