शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

थंडीने गोठली दुधाची मात्रा

By admin | Updated: December 20, 2014 00:03 IST

कडाक्याची थंडी आणि आहारासह जनावरांची निगा घेण्यात शेतकऱ्यांकडून होणा-या बेफिकिरीमुळे परिसरातील पशुधनापासून मिळणा-या दुधाच्या प्रमाणात घट होऊ लागली आहे

पिंपरी : कडाक्याची थंडी आणि आहारासह जनावरांची निगा घेण्यात शेतकऱ्यांकडून होणा-या बेफिकिरीमुळे परिसरातील पशुधनापासून मिळणा-या दुधाच्या प्रमाणात घट होऊ लागली आहे. दुग्ध उत्पादनात सरासरी १० टक्क्यांनुसार ५० हजार लिटर घट असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून केले जात आहे. पिंपरी - चिंचवड शहर परिसरात १५ हजारांवर दुभती जणांवरे आहेत. यासह मावळ तालुक्यातील दुभत्या जनावरांची संख्या ४५ हजार ९२१ आहे. त्यामध्ये १२ हजार ८४८ गाई, २३ हजार ११३ म्हशी, १ हजार ३०६ मेंढ्या, ८ हजार ६५४ शेळ्यांचा समावेश आहे.मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांकडेही २४ हजार ९३१ दुभती जनावरे आहेत. त्यामध्ये १० हजार १८० गाई, ११ हजार ११३ म्हशी, ५२१ मेंढ्या, २ हजार ९१८ शेळ्यांचा समावेश आहे. सध्या तापमान ९ अंशांपर्यंत घसरले आहे. ठरावीक शेतकऱ्यांनी अत्याधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करीत दुभत्या जनावरांसाठी बंदिस्त गोठे बांधले आहेत. येथील दूध उत्पादनावर तुलनेने कमी परिणाम होतो. मात्र ४ ते दहा पशुधन असणाऱ्या बहुतेक शेतकऱ्यांकडील गोठे साध्या पद्धतीचे आहेत. त्यांनी घराशेजारी भिंतीलगतच लाकडांच्या खांबांवर कौलांचे छप्पर करून, तावदान ठोकून कमी खर्चात गोठे तयार केले आहेत. त्यांना जास्त फटका बसत आहे. (वार्ताहर)