शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मंडळांना विश्वासात न घेताच क्यूआर कोड; समिती सदस्यांनी व्यक्त केली नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 23:47 IST

राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्यावतीने (बालभारती) तयार करण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये क्यूआर कोडच्या माध्यमातून संदर्भ साहित्य, आॅडिओ-व्हिज्युअल्स आदी माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पुणे : राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्यावतीने (बालभारती) तयार करण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये क्यूआर कोडच्या माध्यमातून संदर्भ साहित्य, आॅडिओ-व्हिज्युअल्स आदी माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र बालभारतीच्या विषय समिती व अभ्यास मंडळांमधील बहुतांश सदस्यांना कोणतीही माहिती न देता परस्पर हे साहित्य तयार करण्यात आल्याच्या तक्रारी अभ्यास मंडळांच्या सदस्यांनी केल्या आहेत.बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, अनेक दिवसांपासून तो कार्यान्वितच नव्हता. अखेर २ जुलै रोजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या क्यूआर कोडच्या सॉफ्टवेअरचे लोकार्पण करण्यात येणार आहे. दिक्षा अ‍ॅपच्या माध्यमातून हे साहित्य उपलब्ध होणार असल्याची माहिती बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी दिली आहे.बालभारतीची पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी प्रत्येक विषयनिहाय एक विषय समिती व एक विषय अभ्यास गट असतो. विषय समितीमध्ये ५ ते १० तर अभ्यास गटामध्ये २५ ते ३० सदस्य असतात. पाठ्यपुस्तक निर्मितीच्या कामामध्ये विषय समितीमधील सदस्य कोअर गट म्हणून काम करीत असतो तर अभ्यास गटातील सदस्य त्यांना मदत करीत असतात. पाठ्यपुस्तकांची अंतिम जबाबदारी त्यांच्यावर असते. या पाठ्यपुस्तकांशी संबंधित ई साहित्य तयार करून ते विद्यार्थी व शिक्षकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र नेमक्या कोणत्या प्रकारचे हे साहित्य बनविण्यात आले आहे याची माहिती अभ्यास मंडळांमधील बहुतांश सदस्यांना देण्यात आली नाही. याबाबत काही अडचणी निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अभ्यास मंडळांच्या सदस्यांना विश्वासात घेतले गेले असते, तर अधिक योग्य ठरले असते. काही त्रुटी राहिल्या असल्यास त्या दुरूस्त करता येऊ शकल्या असत्या, असे मत अभ्यास मंडळांच्या सदस्यांनी व्यक्त केले आहे.काय आहे क्यूआर कोडराज्य मंडळाच्या पहिली ते दहावीच्या सर्व माध्यमांच्या सर्व विषयांच्या सर्व पाठ्यपुस्तकांमधील प्रत्येक पाठाच्या शेवटी एक क्यूआर कोड दिला आहे. हा कोड मोबाइल, टॅब याद्वारे स्कॅन केल्यास संबंधित पाठाशी संबंधित संदर्भ साहित्य, आॅडिओ-व्हिज्युअल्स उपलब्ध होणार आहेत.

टॅग्स :Puneपुणे