शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पीवायसीच्या दोन संघांची आगेकूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 02:28 IST

पीवायसी हिंदू जिमखाना क्लबतर्फे आयोजित व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेखाली होत असलेल्या डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती प्रौढ राज्य मानांकन

पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लबतर्फे आयोजित व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेखाली होत असलेल्याडॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती प्रौढ राज्य मानांकन अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत सांघिक गटात पीवायसीच्या ‘अ’ व ‘क’ यासंघांनी विजयी आगेकूच केली. भंडारा ‘अ’, पीजे हिंदू जिमखाना ‘ब’ या संघांनीही आपापल्या लढती जिंकल्या.

पीवायसी क्लबच्या कम्युनिटी हॉलमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. सांघिक गटात दुसऱ्या फेरीत उदय गडीकर, राहुल पाठक यांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर पीवायसी ‘क’ संघाने सोलारिस संघाचा ३-० ने धुव्वा उडविला.पीवायसी ‘अ’ संघाने गोरेगाव येथील रॉयल पाल्म्स क्लब संघावर ३-० अशा फरकाने सहजपणे सरशी साधली. विजयी संघाकडून उपेंद्र मुळ्ये, दीपेश अभ्यंकर, शेखर काळे यांनी शानदार कामगिरी केली. अटीतटीच्या लढतीत भंडारा ‘अ’ संघाने मुलुंडच्या बीकेएलपी ‘इ’ संघाचा ३-२ने निसटता पराभव केला. पीजे हिंदू जिमखाना ‘ब’ संघाने नागपूरच्या युनिव्हर्सल ‘अ’ संघाचे आव्हान ३-१ असे मोडीत काढले.

निकाल : सांघिक गट : दुसरी फेरीपीवायसी ‘क’ वि. वि. सोलारिस : ३-० (एकेरी : उदय गडीकर वि. वि. मंगेश जोशी ११-३, ११-५, ११-४; राहुल पाठक वि. वि. मनोज वाघवेकर ११-१, ११-२, ११-८; दुहेरी : उदय गडीकर-राहुल पाठक वि. वि. मंगेश जोशी-मनोज वाघवेकर ११-४, ११-४, ११-६).पीजे हिंदू जिमखाना ‘ब’ वि. वि. युनिव्हर्सल ‘अ’, नागपूर : ३-१ (एकेरी : जयंत कुलकर्णी वि. वि. डॉ. जितेंद्र तावरी ११-५, १२-१०, ९-११, १०-१२, १२-१०; सुहास कुलकर्णी वि. वि. अशोक कळंबे १२-१४, ११-४, ११-७, १२-१०; दुहेरी : सुहास कुलकर्णी-पिनाकीन संपत पराभूत वि. रोहिदास गरुड-अशोक कळंबे ११-१३, १०-१२, ११-३, १३-१५; एकेरी : सुहास कुलकर्णी वि. वि. डॉ. जितेंद्र तावरी ११-५, ११-३, १२-१४, ११-९).

भंडारा ‘अ’ वि. वि. बीकेएलपी ‘इ’, मुलुंड : ३-२ .पीवायसी ‘अ’ वि. वि. रॉयल पाल्म्स क्लब, गोरेगाव : ३-० (एकेरी : उपेंद्र मुळ्ये वि. वि. हितेंद्र निनावे ११-७, ११-५, ११-७; दीपेश अभ्यंकर वि. वि. मनोज दासगुप्ता ११-३, ११-३, ११-६; दुहेरी : दीपेश अभ्यंकर-शेखर काळे वि. वि. हेमेंद्र निनावे-मनोज दासगुप्ता ११-३, ११-७, ११-७).

टॅग्स :Sportsक्रीडाPuneपुणे