शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
5
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
6
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
7
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
8
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
9
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
10
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
11
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
12
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
13
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
14
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
15
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
16
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
17
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
18
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
19
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...

आॅगस्टमध्ये घुमणार पुरुषोत्तमचा आवाज...

By admin | Updated: July 2, 2017 02:58 IST

नऊ संघांत कोण जाणार? ५१ संघांत कोणाला स्थान मिळणार? याची चर्चा आता महाविद्यालयीन विश्वात रंगू लागली आहे. यंदाच्या पुरुषोत्तम

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : नऊ संघांत कोण जाणार? ५१ संघांत कोणाला स्थान मिळणार? याची चर्चा आता महाविद्यालयीन विश्वात रंगू लागली आहे. यंदाच्या पुरुषोत्तम करंडक २0१७ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले असून, ही स्पर्धा दोन टप्प्यांत पार पडणार आहे. दरवर्षी आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात होणारी स्पर्धेची प्राथमिक फेरी यावर्षी बाप्पांच्या आगमनापूर्वी म्हणजे ८ ते २३ आॅगस्टदरम्यान तर अंतिम फेरी गणेशोत्सवानंतर ९ सप्टेंबरपासून रंगणार आहे. ही स्पर्धा जवळपास सव्वा महिना चालणार आहे. सर्वसाधारणपणे आॅगस्ट-सप्टेंबर महिना हा सणासुदीचा काळ असतो, निसर्गाच्या अभूतपूर्व संक्रमणाने आसमंतात नवनिर्मितीचा एक वेगळाच उत्साह संचारलेला असतो. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीही हा दोन महिन्यांचा हंगाम सृजनशील अभिव्यक्तीमधून चैतन्य निर्माण करणारा ठरतो. त्याचे कारण म्हणजे ‘पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा!’ गेल्या पन्नास वर्षांत ही स्पर्धा महाविद्यालयीन जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहे. कलात्मक अभिव्यक्तीच्या विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या या स्पर्धेची प्रतीक्षा प्रत्येक विद्यार्थी करीत असतो. दरवर्षी प्राथमिक आणि अंतिम फेरी सलगपणे घेतली जाते केवळ त्यात काही दिवसांचाच कालावधी असतो. यंदा स्पर्धेदरम्यान २५ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर या काळात गणेशोत्सव आला आहे. त्यामुळे दरवर्षी १३ ते १६ आॅगस्टच्या आसपास सुरू होणारी स्पर्धेची प्राथमिक फेरी यंदा आठवडाभर आधी दि. ८ आॅगस्टपासून घेण्यात येणार आहे. अंतिम फेरी गणेशोत्सव संपल्यानंतर दि. ९ व १0 सप्टेंबरला होणार असल्याची माहिती महाराष्ट्र कलोपासक संस्थेचे चिटणीस राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितली. तसेच कै. राजाभाऊ नातू स्मृतिदिना निमित्त दि. १६ जुलै २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता श्री. प्रदीप वैद्य निर्मित ‘हो - नाझी’ हा दीर्घांक सादर होणार आहे.वेळापत्रक स्पर्धा प्रवेश अर्ज वाटप : १४ व १५ जुलै २०१७स्क्रिप्ट आणि सेन्सॉर सर्टिफिकेट जमा : २२ व २३ जुलै २०१७स्पर्धा प्रवेश अर्ज जमा : ३ आॅगस्ट २०१७स्पर्धा लॉट्स : ५ आॅगस्ट २०१७प्राथमिक फेरी : ८-२३ आॅगस्ट २०१७अंतिम फेरी : ९-१० सप्टेंबर २०१७पारितोषिक विजेत्या एकांकिकेचे चित्रीकरण : ११ सप्टेंबर २०१७