शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पुरुषोत्तम करंडक अंतिम फेरी रंगणार शनिवार-रविवारी; पारितोषिक वितरण समारंभ 14 सप्टेंबरला

By श्रीकिशन काळे | Updated: September 6, 2023 17:07 IST

महाअंतिम फेरी डिसेंबरमध्ये...

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित 58व्या आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी येत्या शनिवारी (दि. 9) आणि रविवारी (दि. 10) होत आहे. तर पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार दि. 14 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.

स्पर्धेला शनिवारी सायंकाळी 5 वाजता सुरुवात होणार असून रविवारी सकाळी 9 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 8 या वेळात स्पर्धा होणार आहे. त्यानंतर स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे चिटणीस ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी दिली. 

अंतिम स्पर्धेत पोहोचलेले संघ : महाविद्यालयाचे नाव आणि कंसात एकांकिकेचे नाव या क्रमाने : अप्पासाहेब जेधे महाविद्यालय (पाईक), झील अभियांत्रिकी महाविद्यालय (परत फिरा रे), आयएमसीसी महाविद्यायल, (मायबाप ..!?), मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय (रवायत ए विरासत), मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड (फेल सेफ), स. प. महाविद्यालय (कृष्णपक्ष), विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय, बारामती (पाऊस पाड्या), राजश्री शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, ताथवडे (पंक्चर पोहे), टिळक आयुर्वेद महाविद्यालय (पिक्सल्स).

विजेत्या संघाचे सादरीकरण :स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि. 14 रोजी आयोजित करण्यात आला आहे. अंतिम फेरीत पुरुषोत्तम करंडक पटकाविणाऱ्या संघाची एकांकिका सायंकाळी 5 वाजता सादर होणार असून त्यानंतर सायंकाळी 6:30 वाजता ज्येष्ठ रंगकर्मी आणि एशिया पॅसिफिक ऑफ इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटचे (आयटीआय-युनेस्को) उपाध्यक्ष विद्यानिधी वनारसे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. 

महाअंतिम फेरी डिसेंबरमध्ये :महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे रत्नागिरी, संभाजीनगर, अमरावती-नागपूर आणि कोल्हापूर या विभागातही घेतली जाते. रत्नागिरी केंद्रावरील फेरी पार पडली असून या केंद्रावर 11 एकांकिका सादर झाल्या. संभाजीनगर येथील स्पर्धा दि. 1 ते दि. 3 ऑक्टोबर, अमरावती-नागपूर विभागाची स्पर्धा दि. 5 ते दि. 7 ऑक्टोबर तर कोल्हापूर विभागाची स्पर्धा दि. 26 ते दि. 28 ऑक्टोबर या कालावधीत होत आहे. स्पर्धेची महाअंतिम फेरी डिसेंबरमध्ये पुण्यात होणार आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड