शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

‘सोमेश्वर’च्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम जगताप

By admin | Updated: May 1, 2015 00:01 IST

येथील सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम जगताप यांची फेरनिवड करण्यात आली. तर, उपाध्यक्षपदी उत्तमराव धुमाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सोमेश्वरनगर : येथील सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम जगताप यांची फेरनिवड करण्यात आली. तर, उपाध्यक्षपदी उत्तमराव धुमाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.दि. १७ एप्रिल रोजी सोमेश्वर कारखान्याची निवडणूक पार पडली होती. यामध्ये राष्ट्रवादी पक्ष पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनलने एकहाती सत्ता मिळविली होती. त्यानंतर गुरुवारी (दि. ३०) सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम पार पडला. त्यानुसार आज सोमेश्वर कारखान्याच्या जिजामाता सभागृहात नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली मासिक सभा पार पडली. या सभेत अध्यक्षपदासाठी पुरुषोत्तम जगताप यांचा, तर उपाध्यक्षपदासाठी उत्तमराव धुमाळ यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी वसुंधरा बारवे व राहुल काळभोर यांनी अध्यक्षपदी पुरुषोत्तम जगताप यांची, तर उपाध्यक्षपदी उत्तमराव धुमाळ यांची निवड करीत असल्याचे जाहीर केले. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती भाऊसाहेब करे, अमृता गार्डी, संचालक रघुनाथ भोसले, अनिल सोरटे, सतीश तावरे, रणजित धुमाळ, नारायण निगडे (सर्व संचालक मंडळ), कामगार, सभासद उपस्थित होते. सोमेश्वर कारखान्यावर असलेले कर्ज ४ वर्षांत फेडणारच, अशी ग्वाही सभासदांना त्यांनी दिली. या वेळी कारखाना कामगार, अधिकारीवर्ग, कामगार पतसंस्था, सोमेश्वर व नीरा पत्रकार गु्रप, सभासद यांच्या वतीने नवनिर्वाचित संचालक मंडळाचे हार घालून सत्कार करण्यात आले. कार्यक्रमात उपाध्यक्ष उत्तमराव धुमाळ, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, कामागरनेते तुकाराम जगताप, कामगार संघटनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब काकडे, दादा तांबे, पुरुषोत्तम परकाळे, दिलीप परकाळे, धनंजय खोमणे यांनी मनोगत व्यक्त केले. कैलास जगताप यांनी सूत्रसंचालन तर, बाळासाहेब गायकवाड यांनी आभार मानले.(वार्ताहर)माजी कृषिमंत्री शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टाकलेली जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळण्यासाठी प्रयत्नशील राहू. सभासदांना, कामागरांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील.- पुरुषोत्तम जगताप, अध्यक्ष, सोमेश्वर साखर कारखाना