शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
2
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
3
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
4
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
5
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
6
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
7
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
9
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
10
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
11
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
12
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
13
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
14
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
15
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!
16
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडला, दिग्दर्शक प्रियदर्शन यांची आली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलून 'शहीद हिंदू घाटी पर्यटन स्थळ' करा, उच्च न्यायालयात याचिका
18
भाच्याच्या प्रेमासाठी पतीची हत्या करुन शेजाऱ्यांना पाठवलं जेलमध्ये, सत्य समजताच हादरले पोलीस
19
3 दिवसांत सर केली हिमालयाची 5 शिखरे, CISFच्या महिला अधिकाऱ्याची ऐतिहासिक कमगिरी
20
जम्मू-काश्मीरमधील सुरनकोट मंदिरावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; SIA कडून मोठा खुलासा

खुनाचा प्रयत्न, चौघांना पाठलाग करुन पकडले

By admin | Updated: July 9, 2015 23:24 IST

किरकोळ कारणांवरून झालेले भांडण सोडविण्यास गेलेल्या तरूणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली.

लोणी काळभोर : किरकोळ कारणांवरून झालेले भांडण सोडविण्यास गेलेल्या तरूणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या पाच पैकी चौघांना गुन्हे शोध पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून मरकळ (ता. खेड) येथे जेरबंद करण्यात यश मिळवले़ त्यामधे एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून दोघे जण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. ए. कोडूभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी आनंद उर्फ अनिल महादेव चव्हाण (वय १९, रा. पठारेवस्ती, कदमवाकवस्ती), इम्तीयाज खाजाखान पठाण (वय २४, रा़ कदमवाकवस्ती), अफसर ऐसान अन्सारी (वय १९, मुळ रा. कदमवाकवस्ती. सध्या मरकळ ता.खेड) व १७ वर्षे वयाचा एक अल्पवयीन मुलगा या चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचा साथिदार हैदर ईराणी हा पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. ३ जुलै रोजी रात्री ९़१५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अविनाश अशोक होनराव (वय ३५, रा.राममंदीरानजीक लोणी काळभोर) हे कदमवाकवस्ती येथील किराणा दुकानासमोर त्यांचे मित्र संदीप जाधव यांचेशी गप्पा मारत ऊभे असताना तेथे दुचाकीवरून आनंद चव्हाण, हैदर ईराणी व अल्पवयीन मुलगा असे तिघे येवून थांबले. त्यांचे पाठीमागून दुकानाशेजारी राहणारे कल्याण पवार आले व त्यांनी एवढ्या जोरात गाडी का चालवता ? अशी विचारणा करताच तिघांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की चालू केली. चव्हाण याने पवार यांना मारण्यासाठी कोयता ऊगारला, त्यावेळी होनराव हे मध्ये पडले असता चव्हाण याने ‘भांडणात मध्ये पडतोस काय तुलाच खल्लास करतो’ म्हणत हातातील कोयता होनराव यांचे डोक्यात मारला. तो वार होनराव यानी ऊजव्या हातावर झेलला. गंभीर जखमी झाल्याने ते ओरडू लागले त्यावेळी ते तिघेही शिवीगाळ करत निघून गेले. लोणी काळभोर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस ऊप निरीक्षक दिलीप पवार,पोलीस हवालदार दत्तात्रय गिरमकर, बाळासाहेब चोरामले, रॉकी देवकाते, स्वप्निल अहिवळे यांनी आरोपी हे मरकळ येथे असल्याची माहिती मिळताच पथकाने तेथे सापळा रचला तेथे पठाण व अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले. परंतू पोलीसाची चाहूल लागताच चव्हाण, अन्सारी व ईराणी हे पळून गेले. त्यातील चव्हाण व अन्सारी या दोघांना सुमारे तीन किलोमीटर पाठलाग करून इंद्रायणी-भिमा नदीच्या संगमापलीकडे पकडण्यात आले. या कामात पोलीस पथकाला तेथील पंचायत समिती सदस्य रविंद्र चव्हाण व पोलीस पाटील बाळासाहेब टाकळकर यानी बहुमोल मदत केली. ईराणी हा अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला. (वार्ताहर)