शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बायकोच्या कामासाठीही एक्सेल शिट, पतीच्या परफेक्शनला कंटाळून घटस्फोटासाठी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 03:01 IST

इंजिनिअर पतीच्या परफेक्शनला आणि मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून उच्च शिक्षित पत्नीने शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला

पुणे : इंजिनिअर पतीच्या परफेक्शनला आणि मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून उच्च शिक्षित पत्नीने शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. तसेच याप्रकरणी पिंपरी येथील न्यायालयात कौटुंबिक हिंसाचाराची याचिका दाखल केली आहे.कॉम्प्युटर सायन्समध्ये एमएस्सी झालेल्या पूजा यांचा २००८ साली इंजिनिअर असलेल्या तुषारशी (नावे बदलेली) विवाह झाला होता. लग्नानंतर पतीकडून रोजच नियमांचा पाढा वाचलाच जाऊ लागला. घरातील कामाबाबत वेगवेगळ्या अटी घालत त्याचे त्रास देणे सुरू झाले. घरातील सर्व खर्चाचा हिशेब एक्सेल सीटमध्ये भरायचा, काही काम असल्यास मेल करायचा असा नित्यनियमच त्याने आखूण दिला होता. त्यात जर काही चूक झाली तर पतीचा मार खावा लागत. पटत नसल्यामुळे आॅक्टोबर २०१७ पासून पीडिता विभक्त राहत होत्या. अखेर त्यांच्या वतीने आता अ‍ॅड. सुप्रिया डांगरे यांनी याचिका दाखल केली आहे. तसेच तुषारकडून पूजा यांच्यावर अनैसर्गिक अत्याचारही झाल्याचे याचिकेतून समोर आले आहे.दररोजची कामे ठरवून देत त्याने तिला एक्सेल सीटमध्ये तीन कॉलम करून पूर्ण, अपूर्ण आणि काय तसेच काम न झाल्याची कारणे याचा तक्ता भरून नोंदी ठेवणे बंधनकारक केले. एखादे काम पूर्ण का झाले नाही याचे कारणही त्याठिकाणी तिला नमूद करावे लागत होते. पूजा करणे, दळण आणणे, कोणते कपडे घालायचे, गाडी वापरणे, जेवण करणे, दुसऱ्यांशी बोलणे अशा विविध गोष्टींचा त्याने नियम तयार केला होता व त्याचे पालन त्यांनी न केल्यास त्रास दिला जात होता. दर शुक्रवारी आठवडाभरात कोणती कामे केली, याचा आढावा त्यांना पतीला द्यावा लागत होता. तसेच नाष्ट्याला मेनू काय असावा आणि तो बनविण्यासाठी किती साहित्य लागेल याचेही गणित केले जाई. पतीकडून परवानगी मिळाली तरच त्यांना घरात तो पदार्थ बनवता येत होता. तर एखादी वेगळी गोष्ट त्यांना घरात करायची झाल्यास पतीला मेल पाठवून त्या गोष्टीसाठी संमती घ्यावी लागत होती.मुलीला देखील करायचा मारहाणपोटच्या सहा वर्षांच्या मुलीला देखील तुषार त्रास देत. किरकोळ कारणावरून तिला मारहाण करणे. एकदा तर तिला पाचव्या मजल्यावरून फेकून देण्याचाही प्रयत्न केला होता. रागात तिला चाकूचा धाक दाखवत पळवून मारण्याचा प्रयत्न करणे, मारहाण करून तिला घराबाहेर ठेवणे असे प्रकार तुषार करीत असल्याचे याचिकेतून पुढे आले आहे.चपातीच्या आकाराची मोजणीचपातीचा आकार २० सेंमीच पाहिजे, असा अजब नियम तुषारने केला होता. दररोज तो त्याची तपासणी करत. तपासणीमध्ये चपातीचा आकार कमी अथवा जास्त झाल्यास तो पूजाला शिवीगाळ व मारहाण करायचा, असे याचिकेत नमूद केले आहे.