शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

गुंजवणीच्या पाण्यासाठी पुरंदरचा एकमुखी ठराव , २ टीएमसी पाणी देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 03:19 IST

गुंजवणी प्रकल्पातील बंद पाइपलाइनच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी आणि भोर, वेल्ह्यासह पुरंदरच्या शेतक-यांना आमच्या वाट्याचे २ टीएमसी पाणी लवकरात लवकर मिळावे, असा एकमुखी ठराव आज करण्यात आला.

खळद : गुंजवणी प्रकल्पातील बंद पाइपलाइनच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी आणि भोर, वेल्ह्यासह पुरंदरच्या शेतक-यांना आमच्या वाट्याचे २ टीएमसी पाणी लवकरात लवकर मिळावे, असा एकमुखी ठराव आज करण्यात आला.शिवरी येथील शिवपार्वती लॉन्स मंगल कार्यालयात शनिवारी गुंजवणी प्रकल्पाबाबत जनसुनावणी पार पडली. यावेळी ११०० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून जनसुनवाई हा याचाच एक भाग असून, या जनसुनवाईनंतर लगेचच तो मंजुरीसाठी ठेवण्यात येईल व अंतिम मंजुरी मिळताच निविदा प्रक्रिया होऊन वर्षभरात कामाला सुरुवात होईल, असे अधिकाºयांनी सांगत सहकार्याचे आवाहन केले.जनसुनावणीला पंचायत समितीचे सभापती अतुल म्हस्के, उपसभापती दत्तात्रय काळे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, हरिभाऊ लोळे,रमेश इंगळे, कैलास कामथे, दिलीप गिरमे, शिवाजीराव पवार, राजेंद्र झेंडे, बाळासाहेब थेऊरकर, अनिल जगताप, बबनराव कामथे, आत्माराम कामथे, सतीश लिंभोरे, किशोर लिंभोरे, राजाभाऊ क्षीरसागर यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, कार्यकारी अभियंता शिवाजी बोलभट, उपअभियंता दिगंबर दुबल, शिवाजी डेंगळे, शहाजी सस्ते आदींनी जनतेच्या प्रश्नांना उत्तरे दिली.यावेळी प्रकल्पाची तांत्रिक व अन्य स्वरूपाची माहिती अधिकाºयांनी उपस्थितांना दिली. बंद जलवाहिनी असलेला गुंजवणी हा देशातील पहिला अत्याधुनिक प्रकल्प असल्याची माहिती यावेळी अधीक्षक अभियंता धुमाळ यांनी दिली. ते म्हणाले की,या प्रकल्पाला केंद्राकडून दुष्काळी निधीतून काही कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. उर्वरित तरतूद राज्य शासनाने केलेली आहे.या जनसुनवाईदरम्यान सर्वांनी या योजनेचे स्वागत केले. मात्र, जुन्या योजनेत ज्या २५ गावांचा समावेश आहे, या गावांतील जमिनीवर सीलिंग करण्यात आले असून, आता या योजनेत नारायणपूर अंतर्गत १७ नवीन गावांचा समावेश झाला असल्याने आमचे सीलिंग कमी करून या गावांवरही सीलिंग टाकावे, अशी जोरदार मागणी या भागातील शेतकºयांनी केली.योजनेची वैशिष्ट्ये३६५ दिवस २४ तास पाणी उपलब्धता शेतकºयांना त्यांच्या सोयीनुसार पिके घेण्याचे स्वातंत्र्य ठिबक किंवा पाट पद्धतीने पाणी वापरण्याची तिन्ही तालुक्यांतील शेतकºयांना मुभा. २४०० मि.मी. व्यासाचा पाईप आवश्यक तेथे स्लुईस व एअर वॉल्व्ह सिंचनाखालील क्षेत्र : वेल्हा - ८५० हेक्टर, भोर - ९४३५ हेक्टर, पुरंदर - १११०७ हेक्टर पाण्याचे प्रेशरहेड आउटलेटच्या मुखाशी असल्याने नारायणपूर उपसा सिंचन योजनेतील शेतकºयांना विद्युत पंप बसवण्याची आवश्यकताराहणार नाही. ६४८५ अश्वशक्तीने होणार पंपिंग पाणीवापर संस्थांची निर्मिती

टॅग्स :Waterपाणी