शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर उपसा योजनेत हस्तक्षेप नको

By admin | Updated: January 13, 2017 02:16 IST

पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर, पुरंदर उपसा जलसिंचन योजनेतही पाणी

 भुलेश्वर : पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर, पुरंदर उपसा जलसिंचन योजनेतही पाणी मिळविण्यासाठी गावपुढारी हस्तक्षेप करू लागले आहेत. मात्र, व्यवस्थित नियोजन असताना हस्तक्षेप झाल्यास पाणी मिळण्यास अडचणी निर्माण होणार आहे. यासाठी नियोजनानुसार पाणी सोडण्याची मागणी लाभार्थी शेतक-यांनी केली आहे.पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी मिळवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांकडून रितसीर फॉर्म भरुन घेण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे यंदाचा रब्बी हंगामातील १ एमसीएफटी पाण्यासाठी शासनाचा ५७,००० इतका दर आहे. मात्र, या योजनेची पाणीपट्टी शासन भरणार असल्याने सध्या १ एमसीएफटी पाण्यासाठी २१०० रुपयेप्रमाणे भरावे लागत आहे. यामध्ये पाणीपट्टी व स्थानिक उपकर यांचा समावेश आहे. यासाठी ८३.३३ टक्के पाणीपट्टी व १६.६७ टक्के असे विभाजन केले जाते. मागणी अर्ज जमा केल्यानंतर, क्रमवारीनुसार पाणी सोडण्यात येते. तसे या योजनेकडून नियोजन केले जाते. पुरंदर उपसा जलसिंचन योजना कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी अनेक शेतकरी पैसे भरुन पाणी घेतात. पैसे भरुन पाण्याची वाट पाहतात व पाणी घेतात. सध्या मोफत पाणी मिळत असल्याने सर्वच जण पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. ज्या ठिकाणी कधी पैसे भरून पाणी गेले नाही, या ठिकाणीही पाणी देण्याची मागणीही होत आहे. पाणी न मिळाल्यास दबावही आणला जातो. यामुळे नियोजनात बदल केल्यास पूर्वीचे नियोजन कोलमोडले जाते. अधिकाऱ्यांची कोंडी नियमाप्रमाणे चालणारे नियोजन बिघडल्याने पाणी मिळणे लांबणीवर जाते. याचा नाहक त्रास अधिकारी वर्गाला सहन करावा लागतो. पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे मोफत पाणी सध्या सुरू आहे. नियोजनानुसार पाणी मिळते. यात निवडणुकीचे राजकारण आल्यास नियोजन कोलमडले जाऊ शकते. याचा नाहक त्रास शेतकऱ्यांबरोबरच चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही होतो. यामुळे नियोजनानुसार पाणी घेणे गरजेचे आहे.

सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आपल्या पक्षाच्या लोकांना लवकर पाणी कसे मिळेल, यासाठी गावपुढाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे या योजनेत राजकारण येत आहे.यामुळे ही योजना चालणार कशी, असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे. यामुळे सुरुवातीपासून सुरू असलेल्या पाण्याच्या नियोजनात कुणीही हस्तक्षेप न करण्याची मागणी लाभार्थी भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.- शरद गायकवाड लाभार्थी शेतकरी