शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ विरोधासाठी पुरंदरचे रस्ते रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 01:18 IST

पुरंदर विमातळाविरोधात स्थानिक शेतकरी आक्रमक होत आहेत.

वाघापूर : पुरंदर विमातळाविरोधात स्थानिक शेतकरी आक्रमक होत आहेत. सोमवारी पूर्व भागातील सर्व रस्ते प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी सकाळपासून रोखून धरले. सकाळी १० पासून दुपारी २ पर्यंत बैलगाड्या आणि गुराढोरांसह ते रस्त्यावर उतरले. रस्त्यावरच दगडांच्या चुली करून स्वयंपाक करण्यात आला, तर अनेक ठिकाणी शासनाचा गोंधळ घालण्यात आला. तसेच, हातात काळे झेंडे घेऊन शासनाविरोधात घोषणा देत जोरदार निषेध करण्यात आला.दरम्यान, शेतकºयांनी आंदोलन करू नये, यासाठी पोलिसांनी दबावतंत्राचा वापर केला. रविवारी रात्री प्रत्येक गावात फिरून आंदोलन केल्यास गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या. तसेच, सकाळीही गावोगावी पोलिसांनी पिंजरे उभे करून पुन्हा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपल्या निर्णयावर ठाम असलेले शेतकरी पोलिसांच्या दबावतंत्राला झुगारून हजारोंच्या संख्येने रस्त्यावर आले. त्यांनी संपूर्ण रस्ते ३ ते ४ तास रोखून धरले. सासवड-वाघापूर, पिसर्वे-सासवड, कुंभारवळण-पारगाव, एखतपूर-खानवडी, उरुळी कांचन-जेजुरी असे सर्व रस्ते ब्लॉक केले व शेतकरी एक झाल्यास काय होऊ शकते, हे दाखवून दिले. तर, जेजुरीच्या पोलीस अधिकाºयांनी गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊनही शेतकरी रस्त्यावरून हटले नाहीत. शेवटी त्यांनाच अशी कोणतीही कारवाई केली नसल्याचा खुलासा द्यावा लागला.वनपुरी येथे सासवड-वाघापूर रस्त्यावर सरपंच नामदेव कुंभारकर आणि उदाचीवाडी गावाचे सरपंच यांच्यासह शेतकºयांनी तब्बल ३ तास रस्ता रोखून धरला. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा परिषद सदस्य आणि विमानतळविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष दत्तात्रय झुरंगे, पंचायत समिती सदस्या सुनीता कोलते, माजी सरपंच रामदास कुंभारकर, एकनाथ कुंभारकर, मच्छिंद्र कुंभारकर, हनुमंत कुंभारकर, संतोष हगवणे, मनेश हगवणे, किसन तात्या कुंभारकर, ग्रामपंचायत सदस्या राजश्री कुंभारकर, लंकेश महामुनी, महादेव कुंभारकर, शाळांमधील विद्यार्थी तसेच वनपुरी, उदाचीवाडी आणि पंचक्रोशीतील शेतकरी व महिल्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.खानवडी येथे सरपंच होले यांच्या मार्गदर्शनाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या वेळी उपसरपंच वैजयंता होले, सदस्य रामदास होले, वर्षा खोमणे, लक्ष्मण बोरावके, रवींद्र फुले, रामभाऊ नेवसे सचिन होले, भाऊ खोमणे, सुरेश होले, नवनाथ होले तसेच महिला व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारगाव-मेमाणे येथील चौफुला येथे सरपंच सर्जेराव मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ४ तास रस्ता रोको करून चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या वेळी माजी सरपंच जितेंद्र मेमाणे विठ्ठल मेमाणे, लक्ष्मण गायकवाड, नंदूसेठ मेमाणे, हरिभाऊ मेमाणे संदीप मेमाणे त्याचप्रमाणे शेकडो महिला, मुले गुरेढोरे घेऊन रस्त्यावर उतरली होती. या वेळी रस्त्यातच दगडी चूल मांडून त्यावर सरकारच्या दशक्रिया विधीचा स्वयंपाक करण्यात आला व त्यानंतर रस्त्यावरच जागरण-गोंधळ घालून ‘सरकारचे डोके ठिकाणावर येऊ दे’असे देवीला साकडेदेखील घालण्यात आले.वनपुरी येथील निकिता हगवणे या विद्यार्थिनीने, स्त्रीशिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचविणाºया क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक जर विमानतळात जाणार असेल, तर त्यांची जयंती साजरी करून उपयोग काय? असा जळजळीत सवाल केला आहे.>विमानतळाची जमीन ही शेतकºयांच्या मालकीची व हक्काची आहे. त्यामुळे त्यांच्या परवानगीशिवाय ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आतापर्यंत शांततेच्या मार्गाने शेतकºयांनी आपला विरोध व्यक्त केला आहे. परंतु, तरीही शासन दखल घेत नसेल तर भविष्यात सर्व आंदोलने आक्रमक पद्धतीने केली जातील. तसेच, यामध्ये शासनाने शेतकºयांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्यास पहिली गोळी मी झेलेन.-बाबाराजे जाधवराव, प्रदेशाध्यक्ष, मनसे शेतकरी संघटना>विमानतळाच्या नावावर सर्वसामान्य जनतेच्या भावनांशी खेळत आहे. ज्यांच्या जमिनी आहेत, त्यांना विश्वासात का घेतले जात नाही? शेतकºयांच्या हक्काच्या जमिनीला हात लावाल, तर तो हात हेच शेतकरी जागेवर ठेवणार नाहीत.- जालिंदर कामठे,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षयापुढे आंदोलन आणखी तीव्र केले जाणार आहे. आमचे म्हणणे विचारात न घेता शासन मुंबईमध्ये बसून एक-एक निर्णय घेत आहे; त्यामुळे जोपर्यंत विमानतळ प्रकल्प मागे घेत नाही, तोपर्यंत हटणार नाही.- दत्तात्रय झुरंगे, अध्यक्ष (विमानतळविरोधी संघर्ष समिती)

टॅग्स :Puneपुणे