शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

पुरंदरचा सीताफळ पल्प परदेशात

By admin | Updated: October 17, 2015 01:04 IST

सीताफळाचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुरंदर तालुक्यातील सीताफळाचा पल्प आता परदेशात निर्यात होऊ लागला आहे. खळद येथील पुरंदर मिल्क या तालुक्यातील साडेतीन हजार शेतकऱ्यांच्या कंपनीच्या

सासवड : सीताफळाचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुरंदर तालुक्यातील सीताफळाचा पल्प आता परदेशात निर्यात होऊ लागला आहे. खळद येथील पुरंदर मिल्क या तालुक्यातील साडेतीन हजार शेतकऱ्यांच्या कंपनीच्या माध्यमातून आज १० टन सीताफळ पल्पचा पहिला कंटेनर गुजरात येथील आनंद या ठिकाणी रवाना झाला असून, तेथील पिपाना बंदरातून या पल्पची बाहेरील देशात निर्यात होणार आहे. खळद - गोटेमाळ (ता. पुरंदर) येथील पुरंदर मिल्कच्या इग्लू कोल्ड स्टोअरेजमधून हा कंटेनर रवाना झाला. येथील राजेंद्र एंटरप्रायजेस यांनी सासवड नगर परिषदेच्या फळबाजारातून सीताफळ घेऊन पुरंदर मिल्कमध्ये महिलांना रोजगार देऊन हा पल्प काढला. प्रक्रिया करून इग्लू कोल्ड स्टोअरेजमध्ये वजा १८ अंश सेल्सिअसला पल्पची काही दिवस साठवण केली व आज त्याची निर्यात करण्यात आली. या वेळी पुरंदर मिल्कचे व्यवस्थापकीय संचालक संजय जगताप, संचालक प्रदीप पोमण, कंपनीचे सीईओ राजेंद्र मांढरे, शेतकरी बाळासाहेब काळाणे, सुदर्शन कुदळे, संदीप लिंभोरे, मामा गरुड, सुधीर जाधव आदी याप्रसंगी उपस्थित होते. (वार्ताहर)