शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सत्तेचा वापर जनकल्याणासाठी केला - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 09:33 IST

बारामती येथे शारदा प्रांगणात युवा नेते युगेंद्र पवार यांच्या पुढाकारातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी  जयंती उत्सव समितीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.

बारामती - देशात अनेक कर्तृत्ववान महिला जन्माला आल्या.यामध्ये संकटावर मात करुन मिळालेली सत्ता रयतेचे राज्य म्हणुन चालविण्याचे काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले.त्यांच्यावर अनेक संकटे आली. त्याची चिंता न करता त्यांनी कर्तृत्व,शाैर्य दाखविले. मिळालेल्या सत्तेचा वापर देशातील जनकल्याणासाठी केला. देशाच्या कानाकोपर्यात बारव,विहीरी निर्माण करुन उपेक्षितांची तहान भागविली. सर्वसामान्यांच्या हाताला काम देण्यासाठी वस्त्रोद्योग उभारले.याचा आज अभिमानाने उल्लेख करावासा वाटतो,अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुण्यश्लोेक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गाैरव केला.

बारामती येथे शारदा प्रांगणात युवा नेते युगेंद्र पवार यांच्या पुढाकारातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती उत्सव समितीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवार बोलत होते.पवार पुढे म्हणाले,देशात अनेक राजे होवून गेले. मात्र, गेल्या २०० ते ३०० वर्षांपासून सामान्यांच्या अंत:करणात ज्यांच्याविषयी आजहि आस`था आहे.त्यांनी सामान्यांचे राज्य प्रस`थापित केले.छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले.हा इतिहास आहे.अहिल्यादेवींच्या कार्यातून आजही नव्या पिढीला आजच्या कार्यक्रमातून मोठी प्रेरणा मिळेल.देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत धनगर समाजाचे मोठे योगदान आहे. या चळवळीत बारामतीच्या जगन्नाथ कोकरे तुरुंगवास भोगल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नमुद केले.

राजकारणाच्या सुरवातीच्या काळात सर्वसामान्य कुटुंबातील लोक माझ्या मागे उभे राहीले.पुर्ण शक्ती माझ्या मागे उभा केली.यात पणदरेचे धुळाबापू कोकरे,विठठलराव कोकरे यांच्यासह अनेकांची नावे घेता येतील.या लोकांमुळेच देश आणि राज्याच्या राजकारणात काम करण्याची संधी मिळाल्याचे पवार यांनी नमुद केले. बारामतीत अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक निर्मिती करण्याबाबत प्रमुख लोकांबरोबर चर्चा करणार असल्याचे देखील पवार म्हणाले.आजच्या कार्यक्रमानिमित्त अहिल्यादेवींचे स्मरण करताना नविन पिढी यशस्वी होइल,यासाठी प्रयत्नशील राहु,असे पवार म्हणाले. 

यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या,धनगर आरक्षणाबाबत भाजप नेते राज्यात आणि दिल्लीत वेगवेगळी भुमिका घेतात.त्यांच्या मनात असणारी आरक्षणाबाबतची भुमिका त्यांनी स्पष्ट करणे गरजेचे आहे.स्वत:च्या सोयीचे राजकारण भाजप नेत्यांनी करु नये,असा टोला सुळे यांनी लगावला.राज्यात आॅक्टोंबर मध्ये आघाडी सरकार आल्यानंतर अहिल्यादेवी,जिजाऊ,सावित्रीबाइ या तिन्ही मातांच्या कर्तृत्वाची भावी पिढीपर्यंत पोहचण्यासाठी शिक्षण धोरणात समावेश करणार.शिक्षणात मनुस्मृती येवु देणार नसल्याचा इशारा सुळे यांनी दिला.

यावेळी अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भुषणराजे होळकर यांनी पुढील वर्षी अहिल्यादेवींची ३०० वी जयंती आहे.या ३०० व्या जयंतीनिमित्त राज्यात अहिल्यादेवींच्या ३०० स्मारकांची निर्मिती करण्याची मागणी केली.त्या स्मारकातून युवा पिढीला प्रेरणा मिळेल,असे त्यांनी नमुद केले. यावेळी उत्तम जानकर,आमदार संजय जगताप,सक्षणा सलगर,युगेंद्र पवार यांची भाषणे झाली.यावेळी राष्ट्रवादी महिला काॅंग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे,आप्पासाहेब जगदाळे,अॅड संदीप गुजर,सत्यव्रत काळे,जगन्नाथ शेवाळे,शर्मिला पवार,सदाशिव सातव,अॅड.एस.एन जगताप,विठ्ठल देवकाते आदी उपस`थित होते.आभार सतीश खाेमणे यांनी मानले.

निवृत्त पोलीस अधिकारी मधोजी शिंदे यांनी धनगर आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे सांगितले.या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘शिंदेसाहेबां’नी आरक्षणा च्या प्रश्नात सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.त्यांना पुर्ण ताकतीने मदत करणार असून लाेकांना न्याय देण्याची काळजी घेणार आहे,अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिंदे यांच्या भूमिकेला पाठींबा व्यक्त केला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार