शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

पुण्याच्या 'अायटम'ने गाजवली दिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 21:03 IST

पुण्यातल्या नाटक कंपनी या संस्थेच्या अायटम या हिंदी नाटकाला मानाच्या महिंन्द्रा एक्सलन्स थिअटर अॅवाॅर्डस या स्पेर्धेत सर्वाेत्कृष्ट नाटकाचे पारिताेषिक मिळाले अाहे.

पुणे : अाम्हाला 'नाटक' करायचंय, या एका विचाराने मार्गक्रमण करणारी पुण्यातील 'नाटक कंपनी' या नाट्यसंस्थेची विशी- पंचविशीतली तरुण मुलं. नाटकासाठी स्वतःला झाेकून देणारी ही तरुण मंडळी. अापलं नाटक अापला विचार लाेकांपर्यंत पाेहचविण्यासाठी कामाला लागलेल्या या तरुणांनी थेट दिल्लीला धडक मारत मराठीचा झेंडा अटकेपार राेवला अाहे. नाटक कंपनीच्या अायटम या नाटकाला मानाच्या समजल्या जाणाऱ्या महिंद्रा एक्सलन्स थिएटर्स अॅवाॅड्स (मेटा) चे सर्वेात्कष्ट नाटकाचे पारिताेषिक मिळाले अाहे. तर याच नाटकातील कलाकार साईनाथ गणुवाड याला सर्वाेत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला अाहे.     दिल्लीत पार पडलेल्या या स्पर्धेत भारतातून 335 नाटकांमधून 10 नाटके निवडण्यात अाली हाेती. या नाटकांचे प्रयाेग नुकताच दिल्लीत पार पडले. अंतिम फेरीसाठी रजत कपूर, अमल अल्लाना, लिलेट दुबे, नीलम मानसिंग, रणजित कपूर अाणि शाेभा दीपक सिंग हे देशातील नाट्यक्षेत्रातील दिग्गज परिक्षक म्हणून हाेते. पुण्यातील तरुण लेखक सिद्धेश पूरकर याने या नाटकाचे लेखन केले अाहे तर क्षितिष दाते याने या नाटकाचे दिग्दर्शन केले अाहे. महिलांना एक उपभाेगाची वस्तू म्हणून सातत्याने समाेर अाणले जाते, मग ते जाहिराती असाे किंवा सिनेमा. याच प्रवृत्तीवर या नाटकातून भाष्य करण्यात अाले अाहे. नुकताच चित्रपट क्षेत्रामध्ये हाेणारे कास्टिंग काऊचचे वास्तव अनेक अभिनेत्रींनी समाेर येऊन सांगितले. बी ग्रेड सिनेमांमध्ये स्त्रीयांना वस्तू म्हणून माेठ्या प्रमाणावर दाखविण्यात येते. व्दिअर्थी संवादातून स्त्रीयांचे नेहमीच चारित्र हनन करण्यात येत असते. याच बी ग्रेड फिल्म इंडस्ट्रीचं वास्तव या नाटकातून दाखविण्यात अाले अाहे.     नाटकाला पुरस्कार मिळाल्यानंत अापल्या भावना व्यक्त करताना सिद्धेश पूरकर म्हणाला, मेटा पुरस्कार मिळाल्याने खरंतर माझा नाटक करण्यामागचा विचार पाेहचविण्यात मी यशस्वी झालाे अाहे असं मला वाटतं. अनेकदा नाटकांमध्ये असणारा एकसुरीपणा मला नकाे हाेता. त्यामुळे वेगळं काहीतरी करण्याच्या विचारात मी हाेताे. मी जाे विषय या नाटकातून मांडला अाहे ताे बी ग्रेड फिल्म इंडस्ट्री बद्दल असल्याने मी नाटक हिंदीत लिहायला घेतलं.  विविध चित्रपट, जाहिरातींमधून स्त्री ची वेगळी प्रतिमा दाखविली जाते. त्याचा स्त्रीयांवर फरक पडत असताे. या पडद्यामागून चाललेल्या गाेष्टी भयानक आहेत. त्याचा समाजमनावर कळत-नकळत खाेलवर परिणाम हाेत असताे. हेच वास्तव अाम्ही या नाटक्याच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.     सर्वेात्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला साईनाथ म्हणाला, मला सर्वेातकृष्ट अभिनेत्याचं पारिताेषिक मिळालं याच्यापेक्षा अामच्या नाटकाला सर्वाेत्कृष्ट नाटकाचं पारिताेषिक मिळालं याचा जास्त अानंद अाहे. या नाटकाला उभं करण्यात अाम्ही खूप कष्ट घेतले हाेते. खासकरुन नाटकाचा लेखक सिद्धेश अाणि नाटकाचा सूत्रधार रवी चाैधरी या दाेघांचे हे नाटक दिल्लीपर्यंत नेण्यात माेठा वाटा अाहे. मेटासाठी नाटक निवडलं गेलं तेव्हाच अाम्हाला खूप अानंद झाला हाेता, त्यामुळे पुरस्कार मिळाल्यनंतर अामचा अानंद गगणात मावेनासा झाला. मेटा सारख्या माेठ्या व्यासपीठावर अामच्या नाटकाला गाैरवनं अामच्यासाठी खूप माेठी गाेष्ट अाहे. 

टॅग्स :Puneपुणेcultureसांस्कृतिकTheatreनाटकMahindraमहिंद्रा