शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेटसक्तीला पुणेकरांचा ‘हात’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 02:56 IST

१ जानेवारी २०१९ पासून हेल्मेटसक्ती सुरू झाली आहे. पुणेकरांनी विरोध केला. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून दररोज सहा ते सात हजार हेल्मेट न वापरणाºया दुचाकीस्वारांवर कारवाई केली जात आहे.

पुणे : वाहतूक पोलिसांनी शहरात हेल्मेटसक्तीबाबत कठोर कारवाई सुरू केल्याने हेल्मेट वापरणाऱ्या दुचाकीस्वारांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. परंतु, डोक्यात हेल्मेट घालण्याऐवजी गाडीच्या आरशाला लटकवून, पेट्रोलच्या टाकीवर ठेवून तसेच स्वत: हेल्मेट घालण्याऐवजी मागे बसलेल्या जोडीदाराकडे हेल्मेट देवून गाडी चालवणाºया दुचाकीस्वारांची संख्याही कमी नाही.

१ जानेवारी २०१९ पासून हेल्मेटसक्ती सुरू झाली आहे. पुणेकरांनी विरोध केला. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून दररोज सहा ते सात हजार हेल्मेट न वापरणाºया दुचाकीस्वारांवर कारवाई केली जात आहे. यामुळे रस्त्यावरील स्वस्तातील हेल्मेट विक्री चांगलीच वाढली आहे. पुणेकर जिवासाठी नाही तर सक्तीसाठी हेल्मेट घालत असल्याचे दिसून येत आहे. इच्छा नसतानाही अनेक दुचाकीस्वार हेल्मेटबरोबर घेवून घराबाहेर पडत आहेत. मात्र, पोलिसांकडून कोणत्याही रस्त्यांवर किंवा चौकात कारवाई केली जात असल्याचे दिसून आल्यावरच दुचाकीस्वार हेल्मेट घालत आहेत. हेल्मेट घालून गाडी चालवण्याची सवय नसल्याने किंवा गाडी चालवणे अवघड जात असल्याने जवळ हेल्मेट असूनही अनेक जण हेल्मेट घालत नाहीत, असे चित्र सध्या शहरात आहे.साधारणपणे सर्वच दुचाकी चालवणारे सर्वसामान्य कुटुंबातील असतात. त्यांना हेल्मेट वापरले नाही म्हणून ५०० रुपये दंडाची रक्कम देणे परवडण्यासारखे नाही. त्यामुळे दंड टाळण्यासाठीच अनेक जण हेल्मेट बरोबर घेऊन फिरताना दिसतात. चौकातील सीसीटीव्ही कॅमेरात आपले छायाचित्र टिपले जाऊ नये, त्यासाठी गाडी चालवताना हातातच हेल्मेट ठेवून चौक जवळ आल्यावर डोक्यात हेल्मेट घालतात. परंतु, काही नागरिकांकडून डोक्याला इजा होऊ नये, यासाठी प्रामाणिकपणे हेल्मेटचा वापर केला जात आहे.

६000 दुचाकीस्वारांवर कारवाई

हेल्मेट परिधान न करणाºया दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू असून शनिवारी दिवसभरात ६ हजार २०४ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Puneपुणे