शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

पुण्याच्या आकांक्षाला विजेतेपद

By admin | Updated: May 7, 2017 03:19 IST

पुण्याची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर आकांक्षा हगवणेने सांगली बुद्धिबळ महोत्सवातील मीनाताई शिरगावकर स्मृती आंतरराष्ट्रीय

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुण्याची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर आकांक्षा हगवणेने सांगली बुद्धिबळ महोत्सवातील मीनाताई शिरगावकर स्मृती आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन खुल्या महिला बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत आकांक्षाने साडेआठ गुणांची कमाई करीत विजेतेपद आपल्या नावे केले. तिला रोख रक्कम ५१ हजार व चंद्राबाई आरवाडे फिरती रौप्यढाल प्रदान करण्यात आली. मुंबईच्या विश्वा शहाला मात्र आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.आकांक्षा हगवणे व सांगलीची गायत्री रजपूत यांच्यात कौशल्यपूर्ण डाव रंगला. अनुभवी आकांक्षाने ७० व्या चालीला गायत्रीचा पराभव केला. कोल्हापूरची फिडेमास्टर ऋचा पुजारी व औरंगाबादची साक्षी चितलांगे यांच्यातील डाव २२ व्या चालीला बरोबरीत सुटला. आंतरराष्ट्रीय पंच राजेंद्र शिदोरे, दीपक वायचळ, विनीता श्रोत्री, विवेक सोहनी, विकास भावे यांनी पंच म्हणून काम पाहिले. सांगली बुद्धिबळ महोत्सवातील मीनाताई शिरगावकर फिडे मानांकन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पुण्याची आंतरराष्ट्रीय महिला मास्टर आकांक्षा हगवणे हिला प्रदान करण्यात आले. या वेळी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारविजेत्या माणिक परांजपे, स्मिता शिरगावकर, चित्रा दळवी, संजय केडगे, राजाभाऊ शिरगावकर, चिंतामणी लिमये आदी उपस्थित होते. या वेळी राजाभाऊ शिरगावकर, स्मिता केळकर, कुमार माने आदी उपस्थित होते. नूतन बुद्धिबळ मंडळाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. बापट बाल विद्यामंदिरमध्ये स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेचा अंतिम निकालआकांक्षा हगवणे : पुणे (प्रथम), विश्वा शहा : मुंबई (द्वितीय), एनएलव्ही अनुषा : आंध्र प्रदेश (तृतीय), साक्षी चितलांगे : औरंगाबाद (चौथी), शालीन पैस : (पाचवी), प्रचिती चंद्रात्रे (सहावी), ऋचा पुजारी : कोल्हापूर (सातवी), गायत्री रजपूत : सांगली (आठवी), नाझिया पटेल : मिरज (नववी), अवरील डेव्हिड (दहावी).