शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छता अ‍ॅप’मध्ये पुणे विसाव्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 04:08 IST

केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता अ‍ॅप’ला देशातील प्रमुख शहरामध्ये कसा प्रतिसाद मिळाला याबाबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये आयटी शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्याचा क्रमांक खूपच मागे पडला असून, शासनाने जाहीर केल्या आकडेवारीमध्ये पुणे विसाव्या क्रमांकावर गेले आहे.

पुणे - केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता अ‍ॅप’ला देशातील प्रमुख शहरामध्ये कसा प्रतिसाद मिळाला याबाबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये आयटी शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्याचा क्रमांक खूपच मागे पडला असून, शासनाने जाहीर केल्या आकडेवारीमध्ये पुणे विसाव्या क्रमांकावर गेले आहे. तर या पाहणीत पिंपरी-चिंचवड सतराव्या क्रमांकावर आहे.केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरातील स्वच्छ शहर मोहिमेत स्वतंत्र ‘स्वच्छता अ‍ॅप’ विकसित केले आहे. या अ‍ॅपला नागरिकांचा मिळणार प्रतिसाद, नागरिकांच्या तक्रारींवर महापालिकेने केलेली कार्यवाही, नागरिकांचा सहभाग आणि प्रतिसाद या संदर्भात केंद्र शासनाकडून सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात देशात ग्वाल्हेरने प्रथम क्रमांक पटकवला असून, बृहन्मुंबईने सहावा, तर नागपूरने अठरावा क्रमांक मिळविला आहे. देशभरातील दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पुण्याला मिळालेल्या या स्थानाचा फायदा स्वच्छ शहरांच्या क्रमवारीत होणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाºयांनी सांगितले.शासनाच्या स्वच्छता अ‍ॅपवर १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत अ‍ॅपचे डाउनलोडिंग, त्या माध्यमातून नागरिकांचा सहभाग, नागरिकांनी केलेल्या तक्रारींवर महापालिकेने केलेली कार्यवाही, त्याला लोकांचा मिळणारा प्रतिसाद यासंदर्भात आकडेवारीच्या आधारे केंद्र सरकारने पाहणी केली़या पाहणीत ग्वाल्हेर प्रथम क्रमांकावर असून, कानपूरने द्वितीय, तर विजयवाडा शहराने तृतीय क्रमांक पटकावला आहे. स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकाधिक प्रोत्साहित करण्यासाठी ही पाहणी करण्यात आली असून, हे गुण अंतिम क्रमवारीत ग्राह्य धरले जाणार आहे.

टॅग्स :Puneपुणे