पुणे : शहरात निर्माण होणाऱ्या एकूण कचऱ्याच प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण १० ते १२ टक्के असते. म्हणजे किती, तर तब्बल १५० ते २०० टन! हा कचरा पाण्याचे नैसर्गिक प्रवाह थांबवतो, गटारी तुंबवतो व कधीही विघटित होत नाही. महापौरांनी दिलेली पुणे शहरातील प्लास्टिक कचऱ्याची ही माहिती ऐकून शहरातील शाळा, महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी थक्कच झाले.संपूर्ण भारतात राबवण्यात येणाऱ्या या अभियानाची सुरुवात पुण्यापासून होत आहे हे ऐकल्यानंतर सर्वजण भारावून गेले व त्यांनी ‘प्लास्टिक कचरामुक्त पुणे’ या अभियानात सक्रिय सहभागी होण्याचा निर्धार महापौर दत्तात्रय धनकवडे व जिल्हाधिकारी सौरव राव यांच्याकडे व्यक्त केला. पर्यावरणमंत्री यांनी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, शहरातील सर्व आमदार तसेच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांची बैठक झाली. त्यात त्यांनी प्लास्टिक कचरामुक्त अभियानाची सुरुवात पुण्यातून करण्याचे जाहीर केले. त्यानुसार १३ फेब्रुवारीपासून या मोहिमेला सुरुवात होत आहे.
पुणेकर करणार प्लास्टिकला ‘टाटा’
By admin | Updated: January 17, 2016 03:31 IST