शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील महिलेला मिळाले चेन्नईत हृदय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 07:16 IST

हृदय आणि फुप्फुसाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पुण्यातील राधिका या महिलेवर हृदय आणि फुप्फुसाचे प्रत्यारोपण यशस्वी झाले

पुणे : हृदय आणि फुप्फुसाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पुण्यातील राधिका या महिलेवर हृदय आणि फुप्फुसाचे प्रत्यारोपण यशस्वी झाले असून मृत्युशी चाललेली तिची झुंज संपली आहे. महाराष्टÑात अनेक ठिकाणी उपचार केले, परंतु, काहीच उपयोग झाला नाही. डॉक्टरांनी हात टेकले होते. त्यानंतर त्यांना चेन्नई येथील रुग्णालयाची माहिती मिळाली आणि त्यांनी तेथे जाऊन उपचार घेतले.राधिकाला जीवदान देण्याचे हे काम चेन्नईतील एका हॉस्पिटलमध्ये घडले आहे. हृदय व फुप्फुसाचे प्रत्यारोपण यशस्वीरित्या करवून घेणारी राधिका ही महाराष्ट्रातील तिसरी व्यक्ती ठरली आहे. राधिका ही मूळची इचलकरंजी येथील रहिवासी आहे. लग्नानंतर पती अभिजित सावंत सोबत पुण्यामध्ये आली. गेल्या ४ वर्षांपासून तिला हृदय व फुप्फुसाचा आजार झाला होता. तेव्हापासून ती रोज मृत्युशी झुंज देत होती. गेल्या ४ वर्षांमध्ये मोठमोठ्या हॉस्पिटल्सला त्यांनी भेट दिली. परंतु, सगळ्याच डॉक्टरांचे प्रयत्न अयशस्वी ठरत होते. मार्च महिन्यामध्ये त्यांना ग्लोबल हॉस्पिटल चेन्नईबद्दल माहिती मिळाली. त्यावेळेस त्यांनी कोणताही विचार न करता थेट चेन्नई गाठले. तेथे गेल्यानंतर कळाले हृदय व फुप्फुसाचे प्रत्यारोपण होऊ शकते. गेल्या ३ महिन्यांमध्ये तेथील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले. तसेच हृदय मिळण्यासाठी वाट पाहावी लागत होती. त्यानंतर नुकतेच हृदय मिळाले आणि राधिकावर प्रत्यारोपण करण्यात आले. त्यामुळे तिला नवजीवन मिळाले आहे. या उपचारासाठी मित्रांनी मदत केली.>अवयवदानाची चळवळ वाढावीदक्षिण भारतामध्ये अपघाती मृत्यू झालेले ७५ टक्के नागरिक अवयवदान करतात. त्यामुळे तेथे अनेकांना जीवदान मिळते. आपल्या महाराष्टÑातही अवयवदानाची चळवळ मोठ्या प्रमाणावर वाढली पाहिजे.आम्ही गेल्या चार वर्षांमध्ये अनेक रुग्णालयांत गेलो. परंतु, डॉक्टरांनी आता काही उपयोग नाही, असे सांगितले. काही महिन्यांचीच ती सोबती असेल, असेही बोलले. परंतु, आम्ही प्रयत्न सोडले नाहीत. मी इंटरनेटवर याबाबत सर्च केले. तेव्हा चेन्नईच्या रुग्णालयाची माहिती समजली. त्यानंतर तिथे आम्ही उपचार घेतले.- अभिजित सावंत,राधिकाचे पती