शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

Pune Vidhan Sabha 2024 : टक्का वाढला तरी जिल्ह्यात सर्वात कमी मतदान, हडपसर बदलाचा कित्ता गिरवणार की इतिहास घडवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 13:04 IST

मतदानाचा फायदा आणि तोटा कुणाला होणार यावर विजयाची गणिते अवलंबून आहेत.

पुणे : विधानसभा निवडणुकीत शहरातील आठ मतदारसंघापैकी सर्वांत कमी म्हणजे ५०.११ टक्के मतदान हडपसर मतदारसंघात झाले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का अवघा २.८६ टक्के वाढला आहे. त्या वाढलेल्या मतदानाचा फायदा आणि तोटा कुणाला होणार यावर विजयाची गणिते अवलंबून आहेत.हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे चेतन तुपे आणि महाविकास आघाडीचे प्रशांत जगताप, मनसेचे साईनाथ बाबर, अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांच्यात लढत झाली आहे. हडपसर मतदारसंघात मध्यमवर्गींयासह 'हाय प्रोफाइल' सोसायट्या आणि झोपडपट्टी भागाचाही समावेश आहे. मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय मतदारांचे प्रमाण जास्त असलेल्या रामटेकडी, वैदुवाडी, साठेनगर हा झोपडपट्टी बहुल प्रभाग या मतदारसंघात येतो. पुणे शहरातील आठ मतदारसंघात सर्वाधिक मतदार हडपसर मतदारसंघात आहे. या मतदारसंघात ६ लाख २५ हजार ६७५ मतदार आहेत. त्यात पुरुषाची ३ लाख २८ हजार, तर महिला २ लाख ९७ हजार ५१५ इतकी आहेत. यंदा या मतदानात २.८६ टक्के वाढ होऊन मतदानाची टक्केवारी ५०.११ टक्के झाली आहे. या मतदारसंघात २०१९च्या निवडणुकीत ४७.२३ टक्के मतदान झाले होते. पुणे शहरातील आठ मतदारसंघामध्ये हडपसर मतदारसंघामध्ये सर्वाधिक कमी मतदान झाले आहे. या मतदानाचा फायदा आणि तोटा कुणाला होणार यावर विजयाची गणिते अवलंबून आहेत.हडपसरमध्ये बदल होणार का इतिहास घडणार ?हडपसर मतदारसंघात २००९ मध्ये शिवसेनेचे महादेव बाबर निवडून आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये भाजपचे योगेश टिळेकर या मतदारसंघात आमदार झाले. २०१९ मध्ये टिळेकरांचा पराभव करीत राष्ट्रवादीचे चेतन तुपे आमदार झाले. त्यामुळे या मतदारसंघात सातत्याने बदल पाहावयास मिळाला आहे. पण, यावेळी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक झाली आहे. त्यामुळे तुपे दुसऱ्यांदा निवडून येऊन इतिहास घडणार की हडपसरमध्ये बदल होणार हे २३ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.