शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

Pune Vidhan Sabha 2024 : पुणेकरांनी पुसला कमी मतदानाचा शिक्का..!

By नितीन चौधरी | Updated: November 22, 2024 09:08 IST

लोकसभेनंतर विधानसभेत मतदानामध्ये झाली ५ टक्के वाढ : सहा मतदारसंघांमध्ये १० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान

पुणे : जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत सुमारे ५ लाख मतदान वाढले आहे. लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत सुमारे ८ लाख अधिक मतदारांनी मतदान केले आहे. यावरून लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत सर्व २१ विधानसभा मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीत सुमारे पाच टक्के मतदान वाढल्याचे दिसत आहे. ही आजवरची मोठी वाढ आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली. विशेष म्हणजे यातील ६ मतदारसंघांत १० टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची वाढ झाली आहे. त्याच वेळी तीन मतदारसंघांमध्ये लोकसभेपेक्षा कमी मतदान झाल्याचे दिसते.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत डाॅ. सुहास दिवसे बोलत होते. त्यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर उपस्थित होत्या. डाॅ. दिवसे म्हणाले की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीच्या तुलनेत आताच्या विधानसभा निवडणुकीत मतदान वाढले आहे. जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत ५ लाख १३ हजार ८४३ इतके मतदार वाढले आहेत. लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत ७ लाख ९३ हजार इतक्या अधिक मतदारांनी मतदान केले आहे.लोकसभेच्या तुलनेत विधानसभेत मावळ, दौंड, भोसरी, शिरूर, खेड, आळंदी आणि जुन्नर या मतदारसंघामध्ये १० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. इंदापूर, भोर, पुरंदर, आंबेगाव आणि खडकवासला या मतदारसंघात पाच ते दहा टक्क्यांदरम्यान मतदानाचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील २१ पैकी १२ मतदारसंघांत मतांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. त्याउलट पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा आणि कोथरूड मतदारसंघात लोकसभेच्या तुलनेत मतदान पाहता कमी मतदान झाले आहे. पुण्यात खूप वर्षांनंतर प्रथमच विधानसभेला मतदानाचे प्रमाण वाढले आहे.गेल्या दीड वर्षापासून मतदार नोंदणीसाठी सुरू असलेले जनजागृतीचे प्रयत्न, मतदार याद्या याबाबत तक्रारींचे प्रमाण कमी होते. तसेच महिला, कामगार, आयटी क्षेत्र, तरुणवर्गाला मतदानाबाबत मोठ्या प्रमाणात प्रोत्साहित करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीत कमी प्रमाणात मतदान झाले होते. त्यामुळे कमी मतदान झालेली साडेआठ हजार केंद्रांपैकी अडीच हजार केंद्रे शोधून काढली होती. त्याबाबत उपाययोजना करण्यात आल्या. तसेच ९३ टक्के मतदान चिठ्ठ्यांचे वाटप केले. त्यामुळे यंदा विधानसभेला पाच टक्क्यांनी मतदान वाढले ही समाधानाची बाब आहे, असेही डाॅ. दिवसे म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक 2024