शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

Pune Unlock : पुणेकरांना वाढीव दिलासा नाहीच! अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, हॉटेल शनिवार व रविवार 'लॉक'च राहणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 19:40 IST

पुण्यातील कोरोना सक्रिय रुग्णसंख्या तीन हजारांच्या आत आली आल्यामुळे पुणेकरांना महापालिकेडून वाढीव दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.

पुणे : राज्य सरकारने 'ब्रेक दि चेन'अंतर्गत निर्बंध शिथिल करण्याबाबत पाच टप्पे तयार केले असून त्यात पुणे दुसरे टप्प्यात आहे. त्यातच पुण्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट झाली असून सक्रिय रुग्ण संख्या देखील तीन हजारांच्या आत आली आहे. त्यामुळे शहरात महापालिकेडून वाढीव दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली असूूून अत्यावश्यक सेवा वगळता पुण्यातील इतर सर्व दुकाने, ब्युटीपार्लर,स्पा,मॉल,हॉटेल शनिवार आणि रविवारी बंदच राहणार आहे. तसेच नाट्यगृहे ,चित्रपटगृह सुरू करण्याबाबत सुधारित आदेशात उल्लेख करण्यात आलेला नाही. 

पुणे महापालिकेने शुक्रवारी(दि. १८) नवीन नियमावली जाहीर केली आली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहे. येेेत्या सोमवार (दि.२२) पासून या निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या नवीन नियमावलीनुसार पुण्यात संध्याकाळी ७ पर्यंत सर्व प्रकारची दुकाने सुरु राहणार असून मॅाल, मल्टिप्लेक्स सिनेमागृह आणि थिएटर हे मात्र बंद असणार आहे. शहरातील विकेंड लॉकडाऊन मात्र कायम ठेवण्यात आला आहे. शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहे.

अशी आहे नवीन नियमावली... 

*दुकाने सकाळी ७  ते संध्याकाळी ७* हॉटेल्स सकाळी ७ ते रात्री १० (पार्सल रात्री ११ पर्यंत) 

* अत्यावश्यक सुविधा वगळता इतर दुकाने शनिवारी ,रविवारी बंद* संचारबंदी रात्री १० पासून* उद्याने सकाळी ५ ते ९ व संध्याकाळी ४ ते ७* Outdoor स्पोर्ट्स ,क्रीडांगणे सकाळी ५ ते ९ , संध्याकाळी ५ ते ७ * अभ्यासिका, वाचनालये ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ७ पर्यंत* राजकीय,सामाजिक ,सांस्कृतिक कार्यक्रम ५० लोकांसह संध्याकाळी ७ पर्यंत परवानगी * लेव्हल 5 असलेल्या ठिकाणी जायचं तर ई पास आवश्यक* शासकीय कार्यलये १०० टक्के क्षमतेने सूूरु* खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याcommissionerआयुक्त