शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विद्यापीठाकडून कॅसच्या मुलाखती पुन्हा रद्द; प्राध्यापक संघटनेचा आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 10:53 IST

विद्यापीठाकडून महाविद्यालयांतील प्राध्यापकांना सापत्नपणाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीशीसंलग्न महाविद्यालयामधील सहयोगी प्राध्यापकांच्या पदोन्नतीसाठी कॅस  (करिअर अ‍ॅडव्हान्समेंट स्कीम) अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या मुलाखती दोन वेळा रद्द करण्यात आल्या.वारंवार मुलाखती रद्द केल्या जात असल्याने प्राध्यापकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच येत्या 9 व 10 जनेवारीपूर्वी 'कॅस' चे कामकाज पूर्ण केले नाही तर विद्यापीठाच्या अधिसभेसमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा स्पुक्टो संघटनेने दिला आहे.पुणे विद्यापीठातर्फे मार्च 2020 मध्ये संलग्न महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापकांच्या ह्यकॅसह्ण च्या मुलाखती घेतल्या जाणार होत्या. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमिवर या मुलाखती स्थगित करण्यात आल्या. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात मुलाखती घेण्याचे नियोजन होते. मात्र, अंतिम वर्षाच्या परीक्षांचे काम आणि लॉकडाऊनमुळे प्रवासावरील येणा-या बंधनांमुळे त्या पुन्हा एकदा स्थगित केल्या. तसेच विद्यापीठाने नुकतेच परिपत्रक प्रसिध्द करून येत्या 22 ते 28 डिसेंबर या कालावधीत ह्य कॅसह्ण अंतर्गत 484 प्राध्यापकांच्या मुलाखती घेतल्या जातील,असे स्पष्ट केले होते. मात्र,पुन्हा एकदा विद्यापीठाने मुलाखती पुढे ढकलल्या.विद्यापीठाकडून वारंवार प्राध्यापकांच्या मुलाखती रद्द केल्या जात असल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाविद्यालयीन अध्यापक संघटनेतर्फे कुलगुरू नितीन करमळकर यांना निवेदन देऊन नाराजी व्यक्त केली. तसेच येत्या 8 जानेवारीपर्यंत कॅसची प्रक्रिया पूर्ण केल्यास 9 व 10 जानेवारी रोजी होणाऱ्या अधिसभेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला.'विद्यापीठाकडून महाविद्यालयांतील प्राध्यापकांना सापत्नपणाची वागणूक'प्राध्यापकांच्या कॅस बाबत शासनाने निर्देश दिलेले असताना विद्यापीठाकडून प्राध्यापकांच्या कॅस अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या मुलाखती वारंवार रद्द केल्या जात आहेत. विद्यापीठाकडून महाविद्यालयांतील प्राध्यापकांना सापत्नपणाची वागणूक दिली जात आहे. त्यामुळे प्राध्यापक संघटनेच्या मंगळवारी झाल्या बैठकीत 9 व 10 जानेवारी रोजी होणाऱ्या अधिसभेसमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. - प्रा.एस.पी.लवांडे, सचिव, एम.फुक्टो,

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठ