सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडीची तीन पथके शुक्रवारी दुपारी पुण्यात दाखल झाली. या बांधकाम व्यवसायिकाच्या बाणेर परिसरातील बंगल्यावर ही पथके पोचली. बंगल्याचे गेटही त्यांनी बंद करून घेतले. कोणालाही आत प्रवेश दिला जात नव्हता. विशेष म्हणजे पुणे पोलिसांनाही त्यांनी याबाबत कोणतीही कल्पना दिली नव्हती. अत्यंत गुप्तपणे हे पथक बंगल्यावर पोचले. दुपारी चौकशीला सुरुवात करण्यात आली. ती रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या पथकात नेमके किती लोक होते किंवा नेमकी काय चौकशी करण्यात आली याबाबत माहिती मिळू शकली नाही.
पुण्यातील बड्या बांधकाम व्यवसायिकाची """"ईडी""""कडून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:09 IST