शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : पासिंगशिवायच रिक्षा रस्त्यावर;आरटीओसमोर घंटानाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 06:40 IST

प्रादेशिक परिवहन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे सध्या हजारो रिक्षांचे पासिंग रखडले आहे. पासिंग न केलेली गाडी मार्गावर आणल्यास वाहतूक पोलीस दंड करीत आहेत. केवळ रिक्षावर उपजीविका असलेल्या रिक्षांचालकांचे त्यामुळे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहेत.

पुणे : प्रादेशिक परिवहन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे सध्या हजारो रिक्षांचे पासिंग रखडले आहे. पासिंग न केलेली गाडी मार्गावर आणल्यास वाहतूक पोलीस दंड करीत आहेत. केवळ रिक्षावर उपजीविका असलेल्या रिक्षांचालकांचे त्यामुळे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहेत.या त्रासाला कंटाळून आता यापुढे पासिंग नसलेली रिक्षा मार्गावर नेणार असल्याची भूमिका रिक्षाचालकांनी घेतली असून दंडाची रक्कम मुख्यमंत्री व परिवहनमंत्र्यांकडून वसूल करा, अशी मागणी करण्यात आली आहे. विविध मागण्या आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजाचा निषेध करण्यासाठी शिवनेरी रिक्षा संघटनेच्या वतीने शनिवारी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाबाहेर (आरटीओ) आंदोलन करण्यात आले.त्या वेळी रिक्षाचालकांनी हा निर्णय घेतला. त्यासाठी संघटनेकडून एक पत्र तयार करण्यात आलेअसून त्यावर इनवर्ड नंबर घेऊन रिक्षाचालक व्यवसाय करणार आहेत.त्यात नमूद करण्यात करण्यात आले आहे, की माझी संपूर्ण उपजीविका रिक्षा व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे आरटीओ पासिंगचे काम करून दिले नाही तरी मी वाहन वापरणार आहे.शनिवारी झालेल्या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष अशोक साळेकर, संंस्थापक आबा बाबर,उपाध्यक्ष गंगाधर महाडिक, कार्याध्यक्ष नितीन साळुंखे, सरचिटणीस विजय लांडे, संघटक रवींद्र अडसुळ यांच्यासह सुमारे २५० रिक्षाचालक सहभागी झाले होते.पासिंगसाठीची आॅनलाइन अपॉइंटमेंट सुविधा २४ तास सुरू ठेवावी, दररोज अपॉइंटमेंट करण्याची क्षमता वाढवावी, अशी मागणी या वेळी आंदोलनकर्त्यांनी केली.पासिंग न केलेले वाहन चालविले म्हणून कारवाई व अपघाती नुकसान झाल्यास त्याबाबतची नुकसानभरपाई, दंड माझ्याऐवजी पुणे आरटीओ, मुख्यमंत्री, परिवहनमंत्री, परिवहन सचिव व परिवहन आयुक्त यांच्याकडून वसूल करण्यात यावा, असे रिक्षाचालकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे़

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीस