शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : गुजरात विजयावरून गदारोळ, भाजपाने मांडला ठराव : काँग्रेस राष्ट्रवादीचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 06:36 IST

गुजरात निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणाºया ठरावावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत रात्री उशिरा बराच गदारोळ झाला. सत्ताधारी भाजपाने मांडलेल्या या ठरावाला राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने तीव्र विरोध केला; मात्र बहुमताच्या जोरावर भाजपाने ठराव मंजूर केला.

पुणे : गुजरात निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणाºया ठरावावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत रात्री उशिरा बराच गदारोळ झाला. सत्ताधारी भाजपाने मांडलेल्या या ठरावाला राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने तीव्र विरोध केला; मात्र बहुमताच्या जोरावर भाजपाने ठराव मंजूर केला.गुजरात निवडणुकीत भाजपाने सलग पाचव्यांदा विजय मिळवला. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा वाटा आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारा ठराव सत्ताधारी भाजपाच्या वतीने सभेच्या शेवटी मांडण्यात आला. याच कारणावरून दुपारी ३ वाजता सुरू झालेली सभा रात्री तब्बल ८ वाजेपर्यंत सुरू ठेवली होती.ठराव मांडल्यानंतर लगेचच त्याला विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी विरोध केला. या महापालिकेची अशी प्रथा नाही. पंतप्रधान व राष्ट्रपती अशा मोठ्या पदांवर निवडून आलेल्या व्यक्तीचे अभिनंदन आजपर्यंत करण्यात आले. ते देशाचे नेते असतात व त्यात गैर काहीच नाही. मात्र एका राज्यातील निवडणुकीत विजय मिळवला म्हणून असे अभिनंदन करणे चुकीचे आहे असे तुपे म्हणाले. काँग्रेसच्या अरविंद शिंदे, अजित दरेकर यांनी काँग्रेसनेही याच निवडणुकीत जागा वाढवून नैतिक विजय मिळवला आहे असे सांगितले व ठरावाला विरोध केला.त्यांच्या विरोधानंतर सभागृहात बराच गदारोळ सुरू झाला. ठराव नको व ठराव हवाच, अशा दोन्ही बाजूंनी घोषणा वगैरे देण्यात येऊ लागल्या. राष्ट्रवादीचे सदस्य आक्रमक होते. त्यांना त्यापेक्षाही जास्त आक्रमकपणे भाजपाच्या नगरसेवकांनी प्रत्युत्तर दिले. बराच वेळ हा गोंधळ सुरू होता. अखेरीस भाजपाच्या वतीने थेट भाषणेच सुरू करण्यात आली. बहुतमाच्या जोरावर ठराव मंजूर करण्याचा निर्णय त्याच वेळी घेतला.भाजपाच्या वतीने स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, धीरज घाटे, आरती कोंढरे, सुशील मेंगडे, सिद्धार्थ शिरोळे, माधुरी सहस्रबुद्धे यांनी यावर भाषणे केली. चेतन तुपे यांनी ही चुकीची प्रथा पाडली जात आहे, अशी टीका केली व ठरावाला विरोध केला.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिका