शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

२३ लाख वाहनांना जूनअखेर ‘सुरक्षा पाटी’ बसणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 09:36 IST

- रोझमार्ट कपंनीच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहनधारकांची तारेवरची कसरत

 पुणे : न्यायालयाच्या आदेशानुसार परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वीची नोंदणी असलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर पाटी ३० जूनपर्यंत बसविणे अनिवार्य केले आहे; परंतु नंबरप्लेट लावण्याचे काम करणाऱ्या रोझमार्ट कंपनीच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिवाय वाहनधारकांकडून मिळणारा अल्प प्रतिसाद, ढिसाळ नियोजन यामुळे पुढील तीन महिन्यांत २३ लाख वाहनांना सुरक्षा पाटी लावण्याचे काम होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

उच्च सुरक्षा नंबर पाटी लावण्याचे काम सुरू आहे. पुण्यात एकूण २६ लाख ३३ हजार वाहनांना पाटी लावावी लागणार आहे. आतापर्यंत केवळ २ लाख ८० हजार वाहनधारकांनी नोंदणी केले आहे. त्यात केवळ ५६ हजार २१२ वाहनांना उच्च सुरक्षा पाटी लावण्यात आले आहे; परंतु पाटी लावण्यासाठी फिटमेंट सेंटरची संख्या कमी आहे. त्यामुळे ज्या वाहनधारकांनी पाटीसाठी नोंदणी केली आहे, त्यांना वेळेवर नंबरप्लेट बसवून मिळत नाही. दुसरीकडे वाहनधारक सुरक्षा पाटी लावण्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे ३० जूनपर्यंत उरलेल्या २३ लाख वाहनांना पाटी लावण्याचे काम पूर्ण होणार की, पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार? याविषयी अनेक प्रश्न पडले आहेत.

 नियमाला हरताळ :

उच्च सुरक्षा पाटी तयार झाल्यावर संबंधित वाहन मालकाच्या गाडीला फिटमेंट सेंटरचालकांकडूून पाटी लावण्यात यावी, असा नियम आहे; परंतु काही फिटमेंट चालक आरसी बुक, चेसिस क्रमांकाची कोणतीही पूर्वतपासणी न करता दुसऱ्या व्यक्तीच्या हातात सुरक्षा पाटी देण्यात येत आहे. त्यामुळे पाटी हरवली किंवा त्याचा गैरवापर झाला तर याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

फिटमेंट सेंटर वाढविण्याकडे दुर्लक्ष

रोझमार्टा कंपनीच्या अधिकाऱ्यांना आरटीओकडून फिटमेंट सेंटर वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीही सेंटरची संख्या काही वाढत नाही. त्यामुळे नागरिकांना खूप दूरच्या तारखा मिळत आहेत. त्यात आता काही सेंटरकडून अचानक काम बंद केले जात असल्याचा फटका वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.

फिटमेंट सेंटरचालकांनी वाहनांना सुरक्षा पाटी लावणे बंधनकारक आहेत. शिवाय संबंधित वाहनांची आरसी बुक आणि चेसिस याची खात्री करून सुरक्षा प्लेट लावावी. कोणाच्या हातात नंबर प्लेट देणे, असे घडत असेल तर संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल. - स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणेसहकारनगर भागातील सेंटरवर ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट मिळण्याबाबत अर्ज केला होता. वेळ नसल्यामुळे मित्राला नंबर प्लेट आणण्यासाठी पाठवले होते. सेंटरवर कोणतीही चौकशी केली नाही. त्याच्या हातात नंबरप्लेट देण्यात आली. हा अतिशय गंभीर प्रकार असून, आरटीओने याकडे लक्ष दिले पाहिजे.- अनिल मोरे, व्यावसायिकमी ८० वर्षांचा आहे. सुरक्षा नंबरप्लेट लावण्यासाठी महिन्यापूर्वी नोंदणी केली होती. दोन दिवसांपूर्वीची तारीख आणि वेळ देण्यात आली होती. संबंधित व्यक्ती घरी येऊन कारला नंबरप्लेट लावून देतील, असे सांगितले होते. दिवसभर घरी थांबलो. मात्र, कुणीच आले नाही. फोनला प्रतिसाद मिळाला नाही.- श्रीकांत देसाई, ज्येष्ठ नागरिक 

 असे आहेत आकडे :

एकूण वाहने - २६ लाख ३३ हजार

पाटीसाठी अर्ज केलेल्यांची संख्या - २ लाख ८० हजार ७१२

बसविण्यात आलेल्या पाटी - ५६ हजार ११३

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड